Monday, April 29, 2024
घरमानिनीHealthफूट कॉर्न्सच्या समस्येवर घरगुती उपाय

फूट कॉर्न्सच्या समस्येवर घरगुती उपाय

Subscribe

काही वेळेस ट्रेंन्डिंग फॅशनला फॉलो करण्याच्या नादात चुकीची फुटवेअर घातले जातात. दिसण्यासाठी ते फुटवेअर खुप आकर्षक आणि सुंदर असतील. मात्र काही दिवसांनी त्यांच्यामुळे समस्या उद्भवू शकतात. काही वेळेस यामुळे फूट कॉर्नची समस्या होऊ शकते. फूट कॉर्नच्या समस्येमागे काही कारणं असू शकतात. केवळ चुकीच्या फुटवेअरमुळे नव्हे तर अधिक उंच टाचांच्या सँन्डल, अनवाणी चालण्याची सवय, दुखापत होणे यामुळे सुद्धा फूट कॉर्नची समस्या निर्माण होते. यामुळे व्यक्तीला चालण्यास अधिक त्रास होतो. यावर तुम्ही पुढील काही घरगुती उपाय करू शकता.(Foot corn home remedies)

-मुलेठी 

- Advertisement -


फूट कॉर्नची समस्या दूर करायची असेल तर तुम्ही मुलेठीची मदत घेऊ शकता. याचा वापर करण्यासाठी तुम्ही एक चमचा राईचे तेल आणि मुलेठी एक चमचा घेऊन त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट रात्री फूट कॉर्न आलेल्या ठिकाणी लावून ठेवा. सकाळी स्वच्छ धुवा.

-सैंधव मीठ

- Advertisement -


सैंधव मीठाचा वापर उपवासाच्या पदार्थांमध्येच नव्हे तर त्वचेसंबंधित काही आजारांवर ही केला जातो. याचा वापर करणयासाठी गरम पाण्यात दोन चमचे सैंधव मीठ टाकून फूट कॉर्न झालेल्या ठिकाणी शेकवा. सैंधव मीठात अँन्टीबॅक्टेरियल गुण असतात. त्यामुळे या उपायामुळे तुम्हाला दिलासा मिळू शकतो.

-लसूण


फूट कॉर्नची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही लसूणचा सुद्धा वापर करू शकता. याचा वापर करण्यासाठी 2-3 पाकळ्या लसूणच्या घेऊन त्या बारीक करा. याच्या पेस्टमध्ये लवंगाची सुद्धा पेस्ट मिक्सकरुन ती फूट कॉर्न आलेल्या ठिकाणी लावा. रात्रभर ती पेस्ट लावून ठेवा आणि सकाळी स्वच्छ धुवा.


हेही वाचा- Monsoon care : पावसाळ्यात बोटांना इन्फेक्शन होऊ नये यासाठी घ्या ‘ही’ काळजी

- Advertisment -

Manini