घरमहाराष्ट्रपुणेपटोलेंनी राजीनामा दिल्यानंतर लगेच 'ही' गोष्ट केली असती तर...; अजित पवारांनी व्यक्त केली खंत

पटोलेंनी राजीनामा दिल्यानंतर लगेच ‘ही’ गोष्ट केली असती तर…; अजित पवारांनी व्यक्त केली खंत

Subscribe

मुंबई : महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने नुकताच निकाल दिला आहे. १६ आमदार पात्र की अपात्र याचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी लवकरात लवकर घ्यावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिले आहेत. या निकालानंतर विधानसभा विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुण्यामध्ये माध्यमांशी बोलताना सांगितेल की, नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर लगेच विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेऊन तो विषय संपवायला हवा होता. पण दुर्दैवाने आमच्या सगळ्यांकडून ते झालं नाही.

नाना पटोले म्हणाले की, नाना पटोले यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना न विचारता राजीनामा दिला होता आणि राजीनामा दिल्यावर त्यांनी माहिती दिली. पटाेले यांनी एक तर राजीनामा द्यायला नको होता आणि राजीनामा दिल्यानंतर लगेच पुन्हा विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेऊन तो विषय संपवायला हवा होता. पण दुर्दैवाने आमच्या सगळ्यांकडून ते झालं नाही.

- Advertisement -

…तर 16 आमदार अपात्र झाले असते
अजित पवार म्हणाले की, मी यासाठी एकट्याला दोषी धरत नाही. आमच्या महाविकास आघाडीकडून पटोले यांच्या राजीनाम्याचा विषय तातडीने धसास लावला असता तर विधानसभा अध्यक्ष बसले असते आणि त्यांच्या अधिपत्याखाली या 16 आमदारांच्या अपात्रतेच्या सर्व गोष्टी झाल्या असत्या. पण बराच काळ उपाध्यक्ष विधानसभेचे काम पाहत होते. अध्यक्षांची जागा रिक्त राहिली आणि त्याच काळात शिदें-फडणवीस यांनी पहिल्यांंदा बहुमताच्या जोरावर ती जागा भरली. जर त्या जागेवर महाविकास आघाडीचा नेता असता तर त्यांनी 16 आमदारांना तेव्हाच अपात्र ठरवले असते, असे आपले मत अजित पवार यांनी व्यक्त केले.

16 आमदार कमी झाले असते तरी सराकर टिकले असते
मी मागेही सांगत होतो की, यातला कोणताही निकाल लागला, काल जो निकाल दिला किंवा वेगळ्या पद्धतीचा निकाल असता तर सरकारवर काही परिणाण होणार नव्हता, कारण त्यांच्याकडे बहुमत होते. त्यामुळे त्यांच्या बहुमतातले 16 आमदार कमी झाले तर राहिलेल्या संख्येमध्ये ते सरकार टिकले असते असे माझे मत होते, असेही अजित पवार यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -