Sunday, April 28, 2024
घरमानिनीReligiousVat Purnima 2023 : अखंड सौभाग्याप्राप्तीसाठी वटपौर्णिमेला 'या' शुभ योगात करा वडाची...

Vat Purnima 2023 : अखंड सौभाग्याप्राप्तीसाठी वटपौर्णिमेला ‘या’ शुभ योगात करा वडाची पूजा

Subscribe

ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला वटपौर्णिमा सण साजरा केला जातो. वटपौर्णिमेला हिंदू धर्मात अधिक महत्त्वाचे स्थान आहे. या दिवशी विवाहीत महिला आपल्या पतिच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी या दिवशी उपवास करुन वडाच्या झाडाची पूजा करतात. यावर्षी हा सण 3 जून रोजी साजरा केला जाईल. वटवृक्ष हा शिवरूपी आहे.

वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त

पौर्णिमा प्रारंभ : 3 जून रोजी सकाळी 11 वाजून 17 मिनिटांपासून
पौर्णिमा समाप्ती : 4 जून सकाळी 9 वाजून 11 मिनिटांपर्यंत. शनिवार , 3 जून रोजी वटपौर्णिमेचा सण साजरा केला जाईल.

- Advertisement -

वटपौर्णिमेला तयार होणार ‘हे’ 3 शुभ योग

Vat Savitri Purnima observed in India

यंदाची वटपौर्णिमा खूप खास असणार आहे कारण, या दिवशी शिव योग, सिद्धी योग आणि रवि योग हे 3 शुभ योग जुळून आले आहेत.

- Advertisement -

शिवयोग प्रारंभ : शनिवारी सकाळपासून दुपारी 02:48 पर्यंत असणार आहे.

सिद्धी योग : दुपारी 02:48 पासून रात्रीपर्यंत असेल.

रवियोग : रविवारी पहाटे 05:23 ते 06:16 पर्यंत असणार आहे.

वट सावित्री पौर्णिमा 2023 पूजा मुहूर्त

पूजेसाठी शुभ मुहू्र्त – सकाळी 07:07 ते 08:51 पर्यंत
दुपारचा शुभ मुहूर्त – 12:19 ते 05:31 पर्यंत
सर्वोत्तम मुहूर्त – दुपारी 03:47 ते 05:31 पर्यंत

वटपौर्णिमेच्या पूजेसाठी लागणारे साहित्य

What is Vat Purnima? Why is it celebrated? - India Today

1 सूतगंडी, 2 खारीक , 2 बदाम, 10 सुपाऱ्या , 2 खोबरे वाटी , खडीसाखर, गुळाचा खडा, अष्टगंध, अक्षता, हळदी कुंकू, धूप , तूपाचे निरंजन, 25 विड्याची पाने , आंबे, पानवड्यांचा नैवेद्य, यथा शक्ति दक्षिणा, पंचामृत, ताम्हण, कलश, कापूर, फूले-दुर्वा, तूळशीपत्र, पाच फळं.


हेही वाचा : Vat Purnima 2023 : वटपौर्णिमेला ‘या’ रंगाची नेसणं मानलं जातं अशुभ

- Advertisment -

Manini