घरमुंबईराजीनाम्यापूर्वी डॉ. तात्याराव लहाने यांनी फडणवीस यांची भेट घेतली होती; माजी खासदाराचा...

राजीनाम्यापूर्वी डॉ. तात्याराव लहाने यांनी फडणवीस यांची भेट घेतली होती; माजी खासदाराचा दावा

Subscribe

मुंबई : जे. जे. रुग्णालयातील 750 निवासी डॉक्टरांनी बेमुदत संप पुकारला आहे. या निवासी डॉक्टरांनी डॉ. तात्याराव लहाने आणि नेत्र विभागाच्या प्रमुख डॉ. रागिणी पारेख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आरोप होण्यापूर्वीच डॉ. लहाने यांच्यासह 9 डॉक्टरांनी राजीनामे दिले आहेत. सर्व घटना सुरू असताना माजी खासदार हरिभाऊ राठोड (Haribhau Rathod) यांनी मोठा दावा  करताना म्हटले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन डॉ. लहाने यांनी रुग्णालयातील कारभाराबाबत माहिती दिली होती. यावर फडणवीसांनी फक्त आश्वासन दिले. फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर 24 तास पूर्ण होताच डॉ. लहने यांनी राजीनामा दिला आहे. यामुळे फडणवीसांनी परिस्थिती हाताळली असती तर डॉ. तात्याराव लहाने यांनी राजीनामे दिले नसते, असे विधान हरिभाऊ राठोड यांनी केले आहे. (Former MP claim Before the resignation Dr. Tatya Rao Lahne meet Fadnavis)

जे. जे. रुग्णालयाचे माजी डीन आणि सुप्रसिध्द नेत्र तज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांच्यासह 9 डॉक्टरांनी राजीनामे दिले आहेत. जे. जे. रुग्णालयात सध्या निवासी डॉक्टर, लहाने आणि डीन यांच्यातील वादामुळे रुग्णांवर परिणाम होत आहेत. परंतु माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केलेल्या दाव्यामुळे या प्रकरणाला राजकीय रंग लागला आहे. जे. जे. रुग्णालयातील प्रकरणाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती देण्यात आली होती. जर त्यांनी वेळेत लक्ष घातले असते तर अशी परिस्थिती उद्भवली नसती.

- Advertisement -

मंत्रालयात डॉ. लहाने यांनी फडणवीसांसमोर मांडली व्यथा
मंत्रिमंडळ बैठकीनंतर मंत्रालयात सहाव्या मजल्यावर डॉ. तात्याराव लहाने यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. जे. जे. रुग्णालयात सुरू असलेल्या प्रकाराबाबत फडणवीस यांना माहिती देताना डॉ. लहाने यांनी आमच्याविरोधत मोर्चे काढले जात आहेत, बदनामी केली जात आहे. त्यामुळे आपण यात लक्ष घालावे अशी मागणी केली होती. मात्र फडणवीस यांनी आपल्या शैलीत हातवारे करत माझे लक्ष आहे, मी करतो, तुम्ही निश्चित राहा, असे ते म्हणाले. परंतु दुसऱ्याच दिवशी डॉ. लहाने यांनी राजीनामा दिला आहे. यामुळे हे सरकारचे अपयश असल्याचा आरोप माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केला आहे.

डीनला पुढे करून सत्ताधाऱ्यांची चाल
जे. जे. रुग्णालयात राज्याच्या अनेक जिल्ह्यातून उपचारासाठी लोक येत असतात. मात्र डॉक्टरांच्या वादाचा रुग्णांच्या उपचारांवर परिणाम होत आहे. वारंवार सरकारकडे याबाबत माहिती दिली असता, कोणतीही कारवाई होत नाही आहे. सरकारने डीनवर कारवाई करायला पाहिजे होती, परंतु हे सरकार कारवाई करताना दिसत नाही. रुग्णालयाच्या डीनला सत्ताधाऱ्यांचा सपोर्ट असल्याचा आरोप हरिभाऊ राठोड यांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -