Sunday, April 28, 2024
घरमानिनीFashionप्रेमाप्रमाणेच फॅशनलाही वय नसतं, बघा 'या' सेलिब्रिटीजकडे

प्रेमाप्रमाणेच फॅशनलाही वय नसतं, बघा ‘या’ सेलिब्रिटीजकडे

Subscribe

फॅशन ही नेहमी ‘तरुण पिढी’मध्ये (Young Generation) शोधले जाते आणि युवा वर्गच फॅशन करण्याचा अधिकार असल्याचा गैरसमज आपल्या समाजात आहे. वयोवृद्ध व्यक्तींने फॅशन करणे चुकीचे किंवा अपराध असल्याच्या समजले जाते.  फॅशन ही तुम्हाला गर्दीतून वेगळे दाखविते. जी फॅशन तुम्ही योग्यरित्या कॅरी करू शकता. इंस्टाग्रामवर काही ‘वृद्ध फॅशनिस्टा’ (Old Fashionista) आहेत. ज्यांना तुम्ही पाहिले तर, तुम्हाला तुमच्या फॅशनवर काम करण्याची गरज असल्याचे नक्कीच जाणवेल.

नीना गुप्ता

फॅशन डिझायनर मसाबा गुप्ताची आई असल्यामुळे नीनाची फॅशनेबल आहे. पण, तिची स्टाइल आणि फॅशन सेन्स पाहता ती नेहमीच फॅशन कॉन्शियस राहिली आहे हे समजू शकते. 60 वर्षीय नीना आजही शॉर्ट्स ते साडीमध्ये फॅशन डीवापेक्षा कमी दिसत नाही.

लीन स्लेटर

सोशल वर्क प्रोफेसर पाच वर्षांपूर्वी फॅशनमध्ये आले. जेव्हा स्ट्रीट स्टाईल फोटोग्राफरच्या कॅमेराने न्यूयॉर्कमधील फॅशनिस्टावर लक्ष केंद्रीत केले. लीनची फॅशन स्टाइल पाहून तरुणाईची स्टाइल फिकी पडू लागेल. लीनची शैली खरोखर अद्वितीय आहे.

मार्नी सेनोफॉन्टे 

बियॉन्से और केंडल जेनरच्या स्टायलिस्ट, मार्नी हाइपबीस्ट ट्रेंड फॉलो करतात आणि त्यांना हाय फॅशन बनवतात. स्टायलिस्टचे वैयक्तिक वॉर्डरोब आणि स्टाईलमध्ये लेअरिंगचे तिचे प्रेम तिच्या Instagram पेजवर स्पष्टपणे दिसून येते. वयानुसार, फॅशन काही फरक पडत नाही, असे दिसते.

- Advertisement -

ऐश्वर्या नारकर

मराठी चित्रपट सृष्टीतील सुंदर अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी 50 व्या वर्षाच्या झाल्या आहेत. आजही त्या तितक्या सुंदर आणि फॅशनेबल आहेतेत. ऐश्वर्याच्या साडीतले बोल्ड फोटोज आजही चाहात्यांचे मने जिंकतात. 90च्या दशकातील ही संदुरी आजही अप्सरासारखी सुंदर दिसते. ऐश्वर्या वर्कआउट्सद्वारे स्वत:ला खूप फिट ठेवते. ऐश्वर्याच्या कातील अदांवर चाहते आजही फिदा आहेत.

- Advertisement -


हेही वाचा – Silk Saree : सिल्कच्या साड्यांची अशी घ्या काळजी

 

- Advertisment -

Manini