घरमनोरंजनऐश्वर्या नारकर यांच्या मुलाचा जबरदस्त डान्स पाहिलात का?

ऐश्वर्या नारकर यांच्या मुलाचा जबरदस्त डान्स पाहिलात का?

Subscribe

मराठमोळे अभिनेते अविनाश नारकर आणि अभिनेत्री ऐश्वर्या नारकर हे कायमच चर्चेत असणारे कपल आहे. या कपलने  90 च्या दशकातील चित्रपट गाजवले होते.मराठमोळे अभिनेते अविनाश नारकर आणि अभिनेत्री ऐश्वर्या नारकर हे कायमच चर्चेत असणारे कपल आहे. ऐश्वर्या नारकर Aishwarya Narkar सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. इन्स्टाग्राम या फोटो शेअरिंग अॅपवर ऐश्वर्या त्यांचे फोटो, व्हिडीओ पोस्ट करत असतात. त्यांच्या अभिनयाची, सौंदर्याची, इतकंच काय तर पती अविनाश नारकर यांच्यासोबतच्या त्यांच्या जोडीची अनेकदा चर्चा होते.अनेकदा त्यांना सोशल मीडियावर ट्रोल देखील केले जाते. तरीही हे कपल शांत बसत नाही. या ट्रोलर्सला चांगलेच सुनावताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर ऐश्वर्या-अविनाश यांच्या मुलाची चर्चा रंगली आहे.

ऐश्वर्या व अविनाश नारकर यांचा मुलगा अमेयला लहानपणापासून अभिनय व नृत्याची आवड आहे. रुईया महाविद्यालयात शिकत असताना त्याने एकांकिका, नाटकात काम केलं आहे. गेल्यावर्षी त्याने दिग्दर्शन क्षेत्रातही पाऊल ठेवलं. ‘खरा इन्स्पेक्टर मागावर’ या व्यावसायिक नाटकाच्या दिग्दर्शनाची धुरा अमेयने सांभाळली. सध्या अमेयच्या एका जबरदस्त डान्स व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by I S H A (@ishaasanjay)

- Advertisement -

 या व्हिडीओत, अमेय व त्याची मैत्रीण ‘गोरी गौरी मांडवाखाली’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. यामधील अमेयचा एनर्जेटिक डान्स पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल. सध्या या व्हिडीओवर कलाकार मंडळींसह नेटकरी भरभरून प्रतिक्रिया देत आहे. अभिनेत्री अश्विनी कासारने कमेंट करत, ‘एनर्जी’ असे म्हटले आहे. तर अविनाश नारकर यांनी कमेंट करत ‘अरे फुल्ल कल्ला’ असे म्हणत मुलाचे कौतुक केले आहे. तर अभिनेत्री अक्षया नाईकने ‘नारू यार…किती दिवसांनी तुला नाचताना बघितलं…आने दो आने दो…’ असे म्हटले आहे. अभिनेता अशोक फळदेसाईने ‘खतरनाक’ अशी कमेंट केली आहे.

ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांच्याप्रमाणे अमेयसुद्धा अभिनयक्षेत्रात काम करणार का, हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र त्याच्या डान्सचे अनेक चाहते सोशल मीडियावर आधीपासूनच आहेत. अमेय विविध थिएटर ग्रुपसोबतही काम करतो. त्याचे पहिले नाटक ‘खरा इन्स्पेक्टर मागावर’ हे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -