घरदेश-विदेशSharad Pawar : "अजित पवारांकडून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न होतोय", शरद पवारांचा आरोप

Sharad Pawar : “अजित पवारांकडून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न होतोय”, शरद पवारांचा आरोप

Subscribe

मला अनेक कार्यकर्त्यांनी सांगितले आहे. आम्हाला फोन येते आणि आम्हाला धमकविले जाते. यापूर्वी बारामतीत होत नव्हत्या. पण पहिल्यांदा यावेळी पाहयाला मिळत आहेत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शरद पवार गटात येणाऱ्या कार्यकर्त्यांना धमकविल्यावर दिली आहे.

बारामती : अजित पवार यांच्याकडूनच लोकांची सहानुभूती मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला आहे. भावनिक आवानह करण्याचे काम आम्ही करणार नाही, असेही शरद पवार यावेळी म्हणाले.

संपूर्ण पवार कुटुंबाने मला वेगळे पाडण्याचा प्रयत्न करत आहे, असे अजित पवार बारामतीत झालेल्या सभेत म्हटले आहे. या प्रश्नावर शरद पवार म्हणाले, “उमेदवारी कोणी असेल तर, त्याला मतदारांची सात घालण्याचा अधिकार आहे. त्या दृष्टीने त्यांनी काही केले असेल. पण संपूर्ण कुटुंबातील लोक एका बाजूला आहेत आणि मीच एकटा आहे, असे सांगणे यांचा अर्थ लोकांना स्वत: भावनाकत्मक भूमिका मांडून त्यांची सहानुभती मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.”

- Advertisement -

हेही वाचा – Chiplun : “फुटेज बघा आणि मग कारवाई करा”, भास्कर जाधवांचे पोलिसांना आवाहन

भावनिकतेच्या मुद्यांच्या पाठी जायाचा की विकासाच्या पाठीमागे उभे राहायचे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीकरांना केले आहे. यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया देत म्हणाले, “भावनिक आवाहन आमच्याकडून करण्याचे काही कारण नाही. कारण बारामती मतदारसंघातील लोक आम्हाला वर्षानुवर्ष मला ओळखत आहेत. त्यामुळे आम्ही भावनिका आवाहन करण्याची गरज नाही. पण ज्या पद्धतीने विरोधकांकडून भूमिका मांडली जाते. पण यांची नोंद बारामतीचा सामंजस्य मतदार निश्चितपणाने घेईल आणि योग्य निर्णय घेईल.”

- Advertisement -

अजित पवार गटातील काही कार्यकर्ते शरद पवार गटात येत असतील तर, त्यांना धमकावण्याचा प्रकार सुरू आहे? यावर शरद पवार म्हणाले, “मला अनेक कार्यकर्त्यांनी सांगितले आहे. आम्हाला फोन येते आणि आम्हाला धमकविले जाते. यापूर्वी बारामतीत होत नव्हत्या. पण पहिल्यांदा यावेळी पाहयाला मिळत आहेत.”

हेही वाचा – Sharad Pawar : पक्ष आणि चिन्हाबाबतचा निर्णय सेटलमेंट करून घेतला गेला – शरद पवार

मुंडेपेक्षा जास्त काळ आव्हाड राष्ट्रवादीत; शरद पवारांचा टोला

जितेंद्र आव्हाड यांच्यामुळे शरद पवार आणि अजित पवारांमध्ये मोठी दरी, असे वक्तव्य मंत्री धनंजय मुंडेंनी केले आहे. या प्रश्नाव शरद पवार म्हणाले, धनंजय मुंडे यांच्यापेक्षा जास्त काळ जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादी पक्षात काम करत आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी देश आणि राज्य पातळीवर काम केले असून ते मंत्री राहिले आहेत. आव्हाड यांना पक्षाची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. आव्हाडांनी काय बोलावे याचे मार्गदर्शन करण्याची अन्य लोकांना गरज नाही, असा टोला शरद पवार यांनी लगावला.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -