Monday, May 13, 2024
घरमानिनीReligiousGanesh Chaturthi 2023 : गणेश चतुर्थीला चंद्रदर्शन का करू नये?

Ganesh Chaturthi 2023 : गणेश चतुर्थीला चंद्रदर्शन का करू नये?

Subscribe

हिंदू धर्मात भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. गणेशोत्सवाच्या पूजेचे तसेच अनेक गोष्टीचे महत्व सांगितले जाते. पौराणिक कथेनुसार, गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र दर्शन करणे वर्ज्य केले जाते. असं म्हणतात की, या दिवशी चंद्राचे दर्शन केल्यास किंवा चंद्राकडे पाहिल्यास अकारण दोष, कलंकचा सामना करावा लागू शकतो. अशावेळी जो व्यक्ति चंद्र दर्शन करतो त्या व्यक्तिवर चोरीचा खोटा आरोप लागू शकतो.

गणेश चतुर्थीला चंद्रदर्शन का करू नये

Full Moon Effects: What Research Has Discovered

- Advertisement -

पौराणिक कथेनुसार, जेव्हा देवा पार्वतीच्या आदेशावरून गणपती बाप्पा घराच्या मुख्य द्वाराबाहेर पहारा देत होते, त्यावेळी महादेव तेथे आले. गणपतीने त्यांना घरामध्ये जाण्यास नकार दिला. तेव्हा महादेवांनी रागात गणपतीचे शिर धडापासून वेगळे केले. ही गोष्ट माता पार्वतीला कळताच त्यांनी आपल्या मुलाला पुन्हा जिवंत करण्यास सांगितले. त्यावेळी महादेवांनी हत्तीचे शिर गणपतीला प्रदान केले. तेव्हापासून बाप्पाला गजानन देखील म्हटले जाते. बाप्पाचे हे मोहक रूप पाहून त्याक्षणी सर्व ब्रह्मांडातले देवी-देवता त्यांना आर्शिवाद देत होते, परंतु चंद्र देव गणपतीच्या रूपावर कुत्सिक पणे हासत होते, त्यावेळी बाप्पाने चंद्राला शाप दिला. की जो व्यक्ति गणेश चतुर्थाच्या दिवशी तुझे दर्शन घेईल, त्या व्यक्तिवर चोरीचा खोटा आरोप लागेल.

मात्र, गणेश चतुर्थीच्या दिवशी तुम्ही चुकून चंद्रदर्शन केले तर अशावेळी तुम्ही तत्काळ बाप्पाची माफी मागा आणि त्यांच्या स्तोत्रांचे पठण करा.

- Advertisement -

 


हेही वाचा : Ganesh Chaturthi 2023 : देशातील ‘या’ राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो गणेशोत्सव

- Advertisment -

Manini