घरमनोरंजनगणपतीसाठी अंबानींच्या घरी बॉलिवूड कलाकारांची गर्दी

गणपतीसाठी अंबानींच्या घरी बॉलिवूड कलाकारांची गर्दी

Subscribe

सध्या सगळीकडे गणेशोत्सव मोठ्या धुमधड्यात साजरा केला जात आहे. बाप्पाचे भक्त बाप्पाची मनोभावे पूजा-आराधना करताना दिसत आहे. अशातच, अंबानी कुटुंबीय देखील दरवर्षीप्रमाणे गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि धुमधडाक्यात साजरा करत आहेत. यासाठी त्यांनी बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांना आमंत्रण देखील दिलं. ज्यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दीपिका-रणवीरची रॉयल एंट्री

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या गणेशोत्सवात रश्मिका मंदाना, वरुण धवन आणि त्याची पत्नी, सलमान खान, शाहरुख यांसारखे अनेक कलाकार उपस्थित होते. मात्र, दीपिका-रणवीरच्या रॉयल एंट्रीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं. यावेळी दोघांनी ट्रेडिशनल आऊटफिट परिधान केला होता. रणवीरने ग्रीन कलरची शेरवानी घातली होती तर दीपिकाने पिंक कलरचा सलवार-सूट घातला होता. यावेळी दोघेही मेड फॉर ईचअदर दिसत होते. चाहते त्यांच्या या लूकवर अनेक कमेंट करत आहेत.

शाहरुख देखील कुटुंबीयांसोबत उपस्थित

- Advertisement -

सध्या ‘जवान’ चित्रपटामुळे चर्चेत असणारा शाहरुख देखील आपल्या कुटुंबीयांसोबत मुकेश अंबानींच्या घर पोहोचला होता. यावेळी शाहरुखने ब्लॅक कुर्ता-पायजमा घातला होता. तर गौरी आणि सुहानाने देखील पारंपारिक लूक केला होता.

याव्यतिरिक्त अंबानींच्या गणेशोत्सवात अनेक दिग्गज कलाकार देखील उपस्थित होते. ज्यात शाहरुख, रणवीर व्यतिरिक्त नयनतारा , विघ्नेश शिवन, रवीना टंडन, अनन्या पांडे, सलमान खान, रेखा, माधुरी दीक्षित, श्रीराम नेने, वरुण धवन, नताशा दलाल, रितेश देशमख आणि जेनिलिया देखील उपस्थित होती.


हेही वाचा : मोठी झाल्यावर संस्कारी होणार… मालतीच्या देसी लूकवर चाहत्याची कमेंट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -