US Debt Crisis: पाकच्या आधी अमेरिकेला दिवाळखोरीचा धोका, कर्ज फेडण्यात अडसर

जगाची आर्थिक महासत्ता म्हणून अमेरिकेकडे पाहिले जाते. परंतु पाकिस्तानच्या आधी अमेरिकेत दिवाळखोरी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या नेतृत्वातील सरकारने जर त्वरित काही उपाय शोधला नाही तर अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच देश डिफॉल्ट होऊ शकतो. अमेरिकेला डिफॉल्टर होण्याचा धोका सतावत आहे. यामुळेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन सातत्याने या धोक्याचा सामना करण्यासाठी रणनिती आखत आहेत. अमेरिकेनेही पाकिस्तान प्रमाणे पहिलं कर्ज घेतलं, परंतु हे कर्ज फेडण्यात त्यांना आता अडसर येत आहे.

सध्या देशाच्या तिजोरीत ५७ अब्ज डॉलर इतकीच रक्कम शिल्लक राहिली आहे, जी भारतीय अब्जाधीश गौतम अदानी यांच्या एकूण संपत्तीपेक्षाही कमी आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सच्या ताज्या आकडेवारीनुसार, अदानींची एकूण संपत्ती सध्या $६४.२ अब्ज इतकी आहे, तर अमेरिकेला व्याज म्हणून दररोज १.३ अब्ज इतका खर्च करावा लागत आहे.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर, अध्यक्ष बायडन आणि रिपब्लिकन हाऊसचे अध्यक्ष केविन मॅकार्थी यांच्यात बैठक झाली. या बैठकीत ‘कर्ज मर्यादा’ वाढवण्याबाबत चर्चा झाली. मंगळवारी प्रथमच अमेरिकन स्टॉक मार्केटने या संकटाच्या पार्श्वभूमीवर वाटचाल सुरू ठेवली. तसेच अवघ्या चार तासांत $४०० अब्ज गमावले. याशिवाय आर्थिक संकट दूर न झाल्यास १ जून रोजी देश डिफॉल्ट होईल, असा इशारा यापूर्वी अमेरिकेच्या अर्थमंत्री जेनेट येलेन यांनी दिला आहे.

कर्ज घेण्याच्या बाबतीत अमेरिकेची सर्वाधिक क्षमता मानली जाते. अशा स्थितीत जर देश यंदा डिफॉल्टर झाला, तर त्याच्या प्रतिमेला धक्का बसण्याची शक्यता आहे. जर अमेरिका डिफॉल्ट झाली तर त्याचे गंभीर परिणाम होतील. व्हाईट हाऊसच्या अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे की, यामुळे देशातील ८.३ लाख नोकऱ्यांवर टांगती तलवार असेल, तर
निम्म शेअर बाजार साफ होईल, जीडीपी ६.१ टक्के घसरेल आणि बेरोजगारीचा दर ५ टक्के वाढेल.


हेही वाचा : पीटीआयचे ‘हे’ मोठे नेते नजरकैदेत, रावळपिंडी प्रशासनाने कायदा आणि सुव्यवस्थेचे दिले