Hindu Shastra : शनीच्या साडेसातीपासून वाचण्यासाठी प्रत्येक शनिवारी करा ‘हे’ उपाय

हिंदू धर्म आणि ज्योतिष शास्त्रानुसार शनी देवांना न्यायाचे दैवत मानले जाते. माणसाच्या चांगल्या-वाईट कर्माचे फळ शनी देव सर्वांना देतात. ज्योतिषशास्त्रात शनि देवांना (ग्रहाला) खूप महत्त्व दिले जाते. असं म्हणतात की, शनिदेव जितके रागीट आहेत, तितकेच ते दयाळू सुद्धा आहेत. चांगले कर्म करणाऱ्या लोकांना शनिदेव कधीही त्रास देत नाहीत, मात्र दुसऱ्यांना विनाकारण छळणाऱ्या शनिदेव चांगलीच शिक्षा देतात.

याशिवाय ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये शनी ग्रह शुभ असेल तर अशी व्यक्ती राजसुख प्राप्त करते. मात्र ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये शनी ग्रह अशुभ स्थितीत असतो अश्या लोकांना शनीच्या साडेसाती काळात अनेक त्रास भोगावे लागतात.

त्यामुळे ज्या व्यक्तींच्या आयुष्यात शनी अशुभ आहे अशा व्यक्तींनी शनीच्या साडेसाती आणि महादशेमध्ये प्रत्येक शनिवारी शनि मंदिरात जाऊन शनिदेवांचे दर्शन घ्यावे. शनिदेवांचे दर्शनाने तुमच्या अडचणींवर मात व्हायला सुरूवात होऊ शकते. तसेच काही खास प्रत्येक शनिवारी काही खास उपाय केल्यावर देखील तुम्हाला अनेक सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील.तसेच शनिच्या साडेसातीचा किंवा महादशेचा त्रासही भोगावा लागणार नाही.

शनिच्या साडेसातीपासून वाचण्यासाठी ‘हे’ उपाय महत्त्वाचे

  • भगवान शंकराची पूजा करा
    भगवान शंकर शनीदेवांचे गुरू आहेत. त्यामुळे भगवान शंकरांची आराधना केल्याने तुम्हाला शनी देवांचा आर्शिवाद सुद्धा प्राप्त होऊ शकतो. प्रत्येक शनिवारी भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन शंकराच्या पिंडीवर जलाभिषेक करा. तसेच शनिवारी हनुमानाजी देखील पूजा केली जाते. या दिवशी हनुमान चालिसेचं पठण करणं खूप लाभकारी ठरेल.
  • शनिवारी काय करावे? काय करू नये?
    शनिवारी लोखंड, काळी वस्तू , छत्री, उडीद डाळ, चमड्यीची चप्पस कधीही खरेदी करू नये. शनिवारी गव्हाचे दळण केल्याने घरात सुख – समृद्धी प्राप्त होते. शनिवारी कधीही विणाकारण खोटे बोलू नये, तसेच शनिवारी कोणत्याही व्यक्तीला त्रास देऊ नये.
  • भाग्य वृद्धिसाठी करा हे उपाय
    शनिवारी संध्याकाळी काळ्या कुत्र्याला किंवा गाईला पोळी खाऊ घातल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तसेच या दिवशी झाडू खरेदी करणं शुभ मानले जाते.

 


हेही वाचा :http://Vastu Tips : तुमच्या पाकिटातील ‘ही’ गोष्ट आजच काढून टाका; नाहीतर होईल नुकसान