Holi 2023 : भारताप्रमाणे ‘या’ देशांमध्येही साजरी केली जाते धुळवड

दरवर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला संपूर्ण भारतात सण साजरा केला जातो. यंदा धुलिवंदनाचा सण 7 मार्च रोजी साजरा केला जाणार आहे. तसेच एक दिवस आधी म्हणजेच 6 मार्चच्या रात्री होलिका दहन केले जाईल. धुलिवंदनाच्या दिवशी सर्व राग- रुसवे, भांडण विसरून एकमेकांना रंग लावतात. भारतासारखे धुलिवंदन परदेशातही वेगवेगळ्या नावांनी आणि पद्धतीने साजरे केले जाते. परदेशात होळी, धुलिवंदनाबद्दल वेगवेगळ्या समजुती आणि कथा आहेत. त्याबद्दल जाणून घेऊया.

नेपाळ

Holi Celebration in Nepal - Famous Festivals of Nepal 2022

भारतात साजरे होणारे जवळपास सर्व सण नेपाळच्या शेजारील देशात साजरे केले जातात. इथे धुलिवंदनाचा मूड वेगळा असला तरी सणाचा उत्साह तोच असतो. धुलिवंदनाला येथे फागु पुन्ही ओळखले जाते. जी फाल्गुन पौर्णिमेसारखीच असते. येथील राजेशाहीच्या काळात राजवाड्यांत बांबूचे खांब उभारून उत्सवाची सुरुवात होते. हा उत्सव आठवडाभर चालतो. डोंगराळ भागात भारतातील धुलिवंदनाच्या एक दिवस आधी होळी साजरी केली जाते.

स्पेन

नेचुरल कलर्स का होगा इस्तेमाल, टोमैटो फेस्ट के जरिए किसानों को फायदा  पहुंचाएंगे युवा | Tomato Fest will be held on Holi in Raipur Raipur Holi  Celebration - Dainik Bhaskar

टोमॅटिनो फेस्टिव्हल दरवर्षी ऑगस्टमध्ये स्पेनमधील बुनोल शहरात साजरा केला जातो. यामध्ये हजारो लोक जमून टोमॅटोची होळी खेळतात. या दिवसाला कोणतेही धार्मिक महत्त्व नसले तरीही भारताच्या धुलिवंदनाची सणाची तुलना टोमॅटोशी केली जाते.

आफ्रिका

Significance of Holi Utsav - Sandipani

आफ्रिका देशात होलिका दहन सारखी परंपरा आहे. अशाच एका परंपरेला ओमेना बोंगा म्हणतात. या दिवशी, अग्नी पेटवून अन्नदेवाचे स्मरण केले जाते आणि लोक रात्रभर जळत्या अग्नीभोवती नाचतात आणि गातात.

पोलंड

Warszawa Festiwal Kolorów Poland | Фестивали, Фестиваль, Летние девушки

पोलंडमध्ये धुलिवंदनाच्या वेळी अर्सिना नावाचा सण साजरा केला जातो. हा धुलिवंदनासारखाच रंगांचा सण आहे. येथे लोक फुलं आणि अत्तरांनी धुलिवंदन खेळतात आणि एकमेकांना मिठी मारतात. पोलंडमध्येही या दिवसाकडे शत्रुत्व विसरण्याचा सण म्हणून पाहिले जाते.

थायलंड

Songkrna Festival 2019 : Thailand Holi - Holi in Thailand | Times of India  Travel

धुलिवंदनाच्या सणाला सोंगक्रान म्हणतात. या दिवशी लोक बौद्ध मठांमध्ये जाऊन भिक्षूंकडून आशीर्वाद घेतात आणि एकमेकांवर सुगंधी पाणी टाकतात.

म्यानमार

MYANMAR-YANGON-HOLI FESTIVAL-CELEBRATION

मेकाँग हा सण धुलिवंदनासारखाच म्यानमारमध्ये साजरा केला जातो. याठिकाणी या सणाला थिंग्यान असे म्हटले जाते. या दिवशी लोक एकमेकांवर पाण्याचा वर्षाव करतात आणि विश्वास ठेवतात की सर्व पापे धुऊन जातात. गेल्या काही वर्षांपासून पाण्याशिवाय येथे रंगही खेळले जातात. समुद्रकिनारे आणि नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण असलेल्या मॉरिशसमधील होळी, बसंत पंचमीपासून सुरू होते आणि जवळजवळ संपूर्ण महिना चालते. येथे होलिका दहनही केले जाते. यावेळी येथे येणारे पर्यटकही धुलिवंदनाच्या उत्सवात सहभागी होतात. याशिवाय अनेक भागांत पाण्याच्या सरीही केल्या जातात.

रोम

Paris : le Holi Festival revient ! - Vivre Paris

 

रोममध्येही धुलिवंदनासारखा सण उत्साहात साजरा होतो. ज्याला रॅडिका म्हणतात. जरी हा सण याठिकाणी मे महिन्यात साजरा केला जातो तरी रंग खेळण्यापूर्वी रात्री येथे लाकडे गोळा करून होळी दहनही केले जाते. यानंतर, दुसऱ्या दिवशी सकाळी लोक त्याच्याभोवती नाचतात आणि रंग खेळतात. यासोबतच फुलांचा वर्षाव केला जातो. इटलीमध्ये असे मानले जाते की, ते अन्नाची देवी फ्लोराला आशीर्वाद देते आणि पिकांचे चांगले उत्पादन देते.


हेही वाचा :

Holi 2023 : रंगपंचमीला तुमच्या राशीनुसार वापरा ‘हे’ रंग; वाढेल यश, मिळेल कीर्ती