घरमुंबईRahul Gandhi Rally Live : आम्ही एका शक्तीविरोधात लढतो आहोत - राहुल...

Rahul Gandhi Rally Live : आम्ही एका शक्तीविरोधात लढतो आहोत – राहुल गांधी

Subscribe

आम्ही एका शक्तीविरोधात लढतो आहोत – राहुल गांधी

माझ्या लोकांची या शक्तीविरोधात लढण्याची हिंमत नाही

- Advertisement -

शक्तीमुळे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रसचे लोक भाजपासोबत गेले

मोदींकडून लोकांची केवळ दिशाभूल

- Advertisement -

ईव्हीएमशिवाय मोदी निवडणूक जिंकू शकत नाहीत

ईव्हीएममधील कागदाची मोजणी करण्यास सत्ताधारी तयार नाहीत

मोदी 56 इंचाची छाती नाही, केवळ पोकळ व्यक्ती

मला सर्व माहिती असल्याने मोदी मला घाबरतात

17/3/2024 20:53:52


उद्धव ठाकरेंची मराठीतून भाषणाला सुरुवात

संविधान बदलण्यासाठी भाजपाला 400 पेक्षा जागा पाहिजेत – उद्धव ठाकरे

जेव्हा सर्व एकत्र येतात तेव्हा हुकूमशाहीचा अंत होतो

देश हाच माझा धक्म

आपली लढाई लोकशाही आणि संविधान वाचविण्यासाठी

17/3/2024 20:18:50


ऐतिहासिक मैदानातून मी सांगू इच्छिते की इंडिया झुकणार नाही आणि थांबणार नाही – कल्पना सोरेन

झारखंडमध्ये कमळ फुलणार नाही तर गटबंधनचं सरकार येणार

17/3/2024 19:43:56


मोदींच्या पराभवासाठी नाही तर देशाचे दोन भाग करणाऱ्या विचाराधारेविरुद्ध आम्ही एकत्र – तेजस्वी यादव

17/3/2024 19:43:26


गांधी, ठाकरे, पवार, आंबेडकर एकत्र; शिवाजी पार्कवर इंडियाची वज्रमूठ

17/3/2024 19:39:44


राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा

इंडिया आघाडीच्या सभेला शिवाजी पार्क येथे सुरुवात झाली. यावेळी काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकेर सोबत बसलेले आहेत. यावेळी दोन्ही नेते गुफ्तगू करताना दिसले.

राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यात मंचावर चर्चा

 

17/3/2024 19:12:30


शिवाजी पार्कवरील सभेला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर राहणार उपस्थित

थोड्याच वेळात राजगृह येथून सभेसाठी करणार प्रस्थान

17/3/2024 18:48:31


मोदी सरकारला चले जाव चा नारा शिवतीर्थावरून द्यायचा आहे – विजय वडेट्टीवार

शेतकरी, सर्वसामान्य यांना उध्वस्त करणाऱ्या मोदी सरकारला चले जाव चा नारा आपल्याला शिवतीर्थावरून द्यायचा आहे

17/3/2024 18:44:57


राहुल गांधींकडून बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतींना वंदन; इंडिया आघाडी निवडणुकीचे बिगुल फुंकणार

17/3/2024 18:43:49


भारत जोडो न्याय यात्रेचे यश पाहून भाजपला पोटशूळ – अलका लांबा

राष्ट्रीय महिला काँग्रेस अध्यक्ष अलका लांबा यांनी शिवाजी पार्कमध्ये येताच भाजपवर तिखट वार केला. भाजप नेत्यांनी सत्याचा स्वीकार केला पाहिजे. दहा हजार किलोमीटर अंतर पूर्ण करुन राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा मुंबईत पोहोचली आहे, याचे आम्ही स्वागत करतो असे अलका लांबा म्हणाल्या. यात्रेला मिळणारा प्रतिसाद पाहून भाजपला पोटशूळ उठला असल्याची टीका त्यांनी केली.


संवैधानिक संस्था आणि संविधान संपवण्याचे षडयंत्र सुरु – तेजस्वी यादव

राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव राहुल गांधींच्या सभेसाठी मुंबईत दाखल झाले आहेत. भाजप सरकारच्या काळात बेरोजगारी, महागाई, शेतकरी, मजुरांचा प्रश्न निर्माण झाल्याचे ते म्हणाले. मोदी सरकारने संवैधानिक संस्था आणि संविधान संपवण्याचे षडयंत्र सुरु केल्याचा आरोप तेजस्वी यादव यांनी केला.

17/3/2024 18:27:30


काँग्रेस नेते सचिन पायलट मुंबईमध्ये दाखल. आगामी लोकसभा निवडणुकीबद्दल म्हणाले की, निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप होत आहे. इंडिया आघाडीचे सर्व नेते एकत्र येत आहेत. इंडिया आघाडीबद्दल फक्त महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण आहे. गेल्या दहा वर्षांत देशाची दिशाभूल करण्यात आली आहे, ते देश पाहत आहे. त्यावर लोक मतदान करतील असा आम्हाला विश्वास आहे. जनेतेच्या मुद्यांवर मतदान झाले पाहिजे, लोकांनी भावनिक होऊन मतदान करु नये.

17/3/2024 18:19:20


वीर सावरकरांचा राजकारणासाठी उल्लेख करणे चुकीचे. राहुल गांधी त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी वारंवार सावरकरांचा अपमान करत आले आहेत. उद्धव ठाकरेंनी त्यांना जोड्याने मारले पाहिजे असे म्हटले होते, आता तेच उद्धव ठाकरे राहुल गांधींसोबत मंचावर हजर असणार आहेत. – रणजीत सावरकर

17/3/2024 18:19:20


काँग्रेस नेते पवन खेरा यांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल. म्हणाले की, एकनाथ शिंदे आता घाबरलेले दिसत आहेत. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरलेले दिसतील.

17/3/2024 18:17:28


राजस्थानचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक गहलोत मुंबईमध्ये पोहचले. माध्यमांशी बोलताना म्हणाले, यंदाच्या निवडणुकीचे निकाल आश्चर्यचकित करणारे ठरणार आहेत. निवडणूक रोखे हा मोदी सरकारचा सर्वात मोठा घोटाळा आहे. या घोटाळ्यामुळे संपूर्ण देशाला धक्का बसला आहे.

17/3/2024 18:17:28


निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच इंडिया आघाडीची पहिली सभा

शिवाजी पार्कवर इंडिया आघाडीची पहिली सभा

17/3/2024 18:10:17

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -