Jammu Kashmir च्या बारामुल्लामधील चकमकीत ३ पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा; १ जवान शहीद

Jammu Kashmir च्या बारामुल्लामधील चकमकीत ३ पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा; १ जवान शहीद

Jammu Kashmir च्या बारामुल्लामधील चकमकीत ३ पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा; १ जवान शहीद

जम्मू काश्मीरमध्ये आज पुन्हा एकदा दहशतवादी आणि पोलिसांमध्ये चकमक झाली. बारामुल्ला येथील करेरी भागातील नजीभात चौरस्त्यावर ही चकमक सुरु झाली, यात तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. त्याचवेळी जम्मू-काश्मीर पोलिसांचा एक जवान शहीद झाला आहे. काश्मीर पोलिसांचे आयजी विजय कुमार यांनी ही माहिती दिली आहे. (Baramulla Encounter)

या घटनेपूर्वी मंगळवारी दहशतवाद्यांनी कुलगाम जिल्ह्यातील यारीपोरा भागातील पोलीस ठाण्यात ग्रेनेड हल्ला केला होता. यावेळी पोलिसांनी आत्मसंरक्षण करत दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले, या हल्ल्यात तीन नागरिक जखमी झाले. अलीकडेच श्रीनगरमध्ये एका पोलीस जवानाची दहशतवाद्यांनी हत्या केली होती. (Jammu Kashmir Encounter)

सौरा भागातील मलिक साब येथील रहिवासी पोलीस कर्मचारी सय्यद कादरी यांचा मुलगा सैफुल्लाह कादरी याच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या हल्ल्यात एका शहीद पोलिसाची मुलगीही जखमी झाली आहे. त्याचवेळी काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीर पोलिसांनी प्रतिबंधित दहशतवादी संघटनेच्या पाच हायब्रिड दहशतवाद्यांना अटक केली होती.

13 मे रोजी जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी केलेल्या चकमकीत लष्कर-ए-तोय्यबाचे दोन दहशतवादी ठार झाले होते. या दहशतवाद्यांनी अलीकडेच काश्मीरमध्ये घुसखोरी केली होती, तसेच बडगाममध्ये काश्मिरी पंडित राहुल भट्ट यांच्या हत्येमध्येही या दोघांचा हात होता. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

जम्मू-काश्मीरमधील बडगाम येथे सरकारी नोकरीत कार्यरत असलेल्या काश्मिरी पंडित राहुल भट्ट यांची लष्कर-ए-तोय्यबाच्या दहशतवाद्यांनी हत्या केली.


Restaurant Service Charges : जबरदस्तीने सेवा शुल्क घेणाऱ्या हॉटेल्स चालकांनो सावध! नाही तर जाल जेलमध्ये


First Published on: May 25, 2022 1:36 PM
Exit mobile version