Sunday, April 28, 2024
घरमानिनीReligiousGauri ganpati 2023 : गौरी गणपतीची आई की बहीण? 'हे' आहे त्यांचं...

Gauri ganpati 2023 : गौरी गणपतीची आई की बहीण? ‘हे’ आहे त्यांचं खरं नातं

Subscribe

बाप्पाच्या येण्याने सगळीकडे चैतन्यमय वातावरण पसरलेलं आहे. अशातच आता गौराईंच्या येण्याची देखील अनेकजण आतुरतेने वाट पाहत आहेत. 21 सप्टेंबर रोजी गौराईचे आगमन होईल. या दिवशी गौराईचा साज श्रृंगार केला जाईल. विविध पदार्थांचा नैवेद्य अर्पण केला जाईल. राज्यभरात गौराईच्या आगमनाची आणि पूजेच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत.

महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये गौराईला नैवेद्य दाखवण्याच्या जश्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, त्याचप्रमाणे विविध भागांमध्ये गौराई आणि गणपतीच्या नातं नेमकं कोणत? गौरी गणपतीची नक्की कोण? याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम आहे.

- Advertisement -

गौरी आणि नेमकं गणपतीचं नातं काय?

Jyeshtha Gauri Puja Vidhi Aarti And Timing - Gauri Puja 2020 Vrat in Marathi गौराई आगमन : 'असे' करा महालक्ष्मी व्रत; वाचा, पूजाविधी व आरती | Maharashtra Times

आपल्याकडे गौरीला माहेरवाशीण म्हटले जाते. गौरी म्हणजेच पार्वतीचेच रूप आणि गणपती हा गौरीचा पुत्र म्हणजेच गौरीला गणपतीची आई आहे. परंतु राज्यातील काही भागांमध्ये गौराईला गणपतीची बहिण तर काही ठिकाणी गौराईला गणपतीची बायको देखील मानले जाते. परंतु खरंतर गौरी ही गणपतीची आई आहे.

- Advertisement -

3-4 दिवस आधी आलेल्या आपल्या बाळाला घेऊन जाण्यासाठी गौरी माहेरी येते. माहेरी आल्यावर दोन दिवस पाहुणचार घेऊन तिसऱ्या दिवशी निघून जाते. काही ठिकाणी गौरी आगमनाला महालक्ष्मीचे आगमन देखील म्हटले जाते. गौरी आवाहनच्या पहिल्या दिवशी गौराईला भाजी-भाकरीचा नैवेद्य दाखवला जाईल. तर गौरी पूजनाच्या दिवशी दुसऱ्या दिवशी पुरणपोळी किंवा श्रीखंड पुरीचा नैवेद्य दाखला जाईल. काही ठिकाणी विविध प्रकारचे नैवेद्य दाखवण्याची देखील प्रथा आहे.


हेही वाचा :

Gauri ganpati 2023 : कधी आहे गौरी आवाहन, पूजन आणि विसर्जन? जाणून घ्या शुभ मुहूर्त

- Advertisment -

Manini