घरमहाराष्ट्रपुणेMaharashtra Rain : मुंबई, पुण्यासह या भागात पावसाची शक्यता; मात्र मराठवाड्यावर अवकृपाच

Maharashtra Rain : मुंबई, पुण्यासह या भागात पावसाची शक्यता; मात्र मराठवाड्यावर अवकृपाच

Subscribe

मुंबई : राज्यात उशीरा दाखल झालेल्या पावसाने दडी मारल्यानंतर दहीहंडीचा मुहुर्त गाठत पुन्हा एकदा दमदार सुरूवात केली आहे. सध्या बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असल्यामुळे राज्यांमध्ये पावसासाठी पोषक हवामान असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली असून पुढील 2 दिवसांमध्येही पावसाचा जोर वाढेल अशी शक्यताही वर्तवण्यात आली आहे. मात्र असे असले तरी मराठवाड्यातील काही जिल्ह्यावर दुष्काळाची टांगती तलवार आहे. (Maharashtra Rain Mumbai Pune Rain Marathwada Drought)

हेही वाचा – पडळकरांच्या वक्तव्यानंतर अजित पवार गट काही शांत होईना; काळं फासणाऱ्याला लाख रुपये देणार

- Advertisement -

राज्यात पुढच्या 3 ते 4 दिवसांमध्येदेखील पाऊस सक्रिय असेल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. या काळात विदर्भातील गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊसाची शक्यता असली तरी कोकण परिसरामध्ये तुरळक पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. शुक्रवारपासून राज्यातील काही भागात पावसाचा जोर आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. उद्यापासून (21 सप्टेंबर) पुण्यासह घाटमाथ्यावर आणि इतर काही भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र या काळात मुंबई, ठाणे, पालघरमध्येही ढगाळ वातावरण असेल तर, काही ठिकाणी पावसाची उघडीप पाहायला मिळणार आहे.

मराठवाड्यावर दुष्काळसदृश्य परिस्थिती

राज्यातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता असली तरी यंदा अपेक्षित पाऊस झाला नसल्यामुळे मराठवाड्यातील अनेक भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे. त्यामुळे राज्यातील 13 जिल्ह्यांवर दुष्काळाचं सावट असून, काही जिल्हे तर थेट रेड झोनमध्ये असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 13 जिल्ह्यांमध्ये पिण्यासाठी पाणी, जनावरांच्या चाऱ्याची परिस्थिती गंभीर आहे. राज्यातील 13 जिल्ह्यात सरासरी पेक्षा खूपच कमी पाऊस झालेला आहे. ज्यात अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव,सोलापूर, सांगली, सातारा, परभणी, हिंगोली, वाशीम, अकोला, अमरावती या जिल्ह्यात सरासरी पेक्षा खूप कमी पाऊस झाल्यामुळे या भागात दुष्काळाचे सावट आहे.

- Advertisement -

हेही वाचा – गौतमी पाटीलचे कोल्हापूरमधील कार्यक्रम रद्द; पोलिसांनी नाकारली परवानगी, कारण काय?

मराठवाड्यातील 6 जिल्हे रेड झोनमध्ये

राज्यातील अनेक भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असल्यामुळे मराठवाड्यातील आठपैकी 6 जिल्ह्यांचा रेड झोनमध्ये समावेश करण्यात आला आहे. नांदेड आणि लातूर जिल्हा सोडल्यास छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव,परभणी, हिंगोली या 6 जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात परिस्थिती गंभीर असून याठिकाणी अनेक गावात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -