आषाढी एकादशीच्या दिवशी करा ‘या’ मंत्राचे पठण; होईल सर्व दुःखांचे निवारण

एकादशीचे व्रत करणाऱ्या व्यक्तींची पापा पासून मुक्ती मिळते आणि त्यांना पुण्याची प्राप्ती होते. एकादशीचे व्रत केल्याने आयुष्यात संपन्नता येते

हिंदू धर्मात एकादशी व्रताचे मोठे महत्व सांगण्यात आले आहे. एकादशीचे व्रत भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांना प्रसन्न करण्यासाठी केले जाते. हिंदू पंचांगानुसार, प्रत्येक महिन्यामध्ये दोन वेळा एकदशी येते. त्यापैकी एक कृष्ण पक्षामध्ये असते, तर दुसरी शुक्ल पक्षामध्ये असते. अशाप्रकारे वर्षामध्ये एकूण २४ एकादशी येतात. यापैकीच आषाढ महिन्यातील एकादशीला सर्वोत्तम मानले जाते. असं म्हणतात की, एकादशीचे व्रत करणाऱ्या व्यक्तींची पापा पासून मुक्ती मिळते आणि त्यांना पुण्याची प्राप्ती होते. एकादशीचे व्रत केल्याने आयुष्यात संपन्नता येते.

यंदा आषाढी एकादशी १० जुलै रोजी असणार आहे, याशिवाय याच दिवशी चातुर्मास सुद्धा चालू होणार आहे. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार चार्तुमास चालू झाल्यानंतर ४ महिने भगवान विष्णू पाताळ लोकामध्ये शयन करण्यासाठी जाताता. त्यामुळेच या एकादशीला देवशयनी एकादशी सुद्धा म्हटलं जातं.

आषाढी एकादशी वेळ
९ जुलै संध्याकाळी ४ वाजून ३९ मिनिटांपासून ते
१० जुलै दुपारी २ वाजून १३ मिनिटांपर्यंत

आषाढी एकादशी कशी साजरी कराल

  • एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ कपडे परिधान करून सूर्य देवाला अर्घ्य अर्पण करावे.
  • घरातील देवी-देवतांची पूजा करावी, तसेच भगवान विष्णूंना पिवळी फुलं, चंदन, तुळस अर्पण करावी. धूप-दीप लावून त्यांची आरती करावी.
  • पूजा पूर्ण झाल्यावर ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ या मंत्राचा जप करा, तसेच विष्णूच्या स्तोत्रांचे पठण करा.
  • भगवान विष्णूंना नैवेद्य अर्पण करा.

आषाढी एकादशीचे महत्व

  • आषाढी एकादशीचे व्रत केल्याने भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होतात. तसेच अशा व्यक्तीच्या घरात कधीही धन-धान्याची कमतरता भासत नाही.
  • आषाढी एकादशीचे व्रत केल्याने कुटुंबातील वाद, क्लेश बंद होतात तसेच आर्थिक परिस्थिती सुधारते. व्यवसायात वाढ होते.
  • आषाढी एकादशीचे व्रत केल्याने यश, किर्ती वाढते. तसेच शिक्षण आणि नोकरीमध्ये सफलता प्राप्त होते.

 


हेही वाचा :आषाढी एकादशीनिमित्त एसटी महामंडळाच्या ४७०० विशेष गाड्या धावणार