Monday, April 29, 2024
घरमानिनीRelationshipParenting Tips- एकुलत्या एका मुलाचे संगोपन करताना टाळा या चुका

Parenting Tips- एकुलत्या एका मुलाचे संगोपन करताना टाळा या चुका

Subscribe

मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी, त्यांना चांगले आणि निरोगी संगोपन देणे आवश्यक आहे. पण एकुलत्या एक मुलाच्या संगोपनाचा प्रश्न येतो तेव्हा पालकांची जबाबदारी थोडी अधिकच वाढते. यात पालकांकडून नकळत अशा काही चुका होतात ज्याचे दिर्घ परिणाम मुलांच्या आयुष्यावर होतात.

तुमच्या इच्छा मुलांवर लादू नका
आपल्या मुलांनी आपली अपूर्ण स्वप्ने पूर्ण करावीत, अशी पालकांची अपेक्षा असते. जर तुम्हीदेखील हीच चूक करत असाल तर वेळीच सावध व्हा. तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मुलावर कधीही दबाव आणू नका. असे केल्यास मुलावर ताण येऊ शकतो. त्यामुळे त्याच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावरही विपरीत परिणाम होतो.

- Advertisement -
निर्णय घेण्याचा अधिकार 
अनेक वेळा पालक आपल्या मुलांना लहान,मूर्ख आणि बेजबाबदार समजतात आणि त्यांच्या आयुष्याशी संबंधित प्रत्येक निर्णय स्वतःच घेऊ लागतात. तुम्हीही जर हेच करत असाल तर तुम्ही नकळत तुमच्या मुलाचा आत्मविश्वास कमकुवत करत आहात हे लक्षात घ्या. तुम्ही मुलाचे फक्त पालक आहात. त्याच्यावर योग्य संस्कार करणे त्याला घडवणे हे जरी तुमचं काम आहे. पण याचा अर्थ नाही की तुमचं मूलं निर्णय घेण्यास सक्षम नाही.तर लहानपणापासूनच त्याचे निर्णय एका ठराविक वयानंतर त्याचे त्याला घेऊ द्या. जरी तो निर्णय घेण्यास चुकला तरी तो त्यातून शिकेल आणि सावध होईल. काय योग्य आणि काय अयोग्य हे त्याला कळेल. हा अनुभव त्याला भविष्यात उपयोगी येईल.

असुरक्षित
एकुलत्या एक मुलाचे पालक असुरक्षित असतात. मुलाच्या प्रत्येक कामात ढवळाढवळ करतात. त्यांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे मुलाचा आत्मविश्वास कमी होतो आणि तो आपले मत इतरांसमोर उघडपणे मांडू शकत नाही.

- Advertisement -
स्वावलंबी
तुम्ही कायम तुमच्या मुलाबरोबर राहू शकत नाही. हे मान्य करा. आज ना उद्या तुम्ही जगाचा निरोप घेणार. त्यानंतर त्याला एकट्याने जगावे लागणार. त्यामुळे त्याला स्वावलंबी बनवा. जेणेकरून तो आत्मविश्वासाने जगू शकेल.

Edited By

Aarya joshi

- Advertisment -

Manini