घरमहाराष्ट्रRohini Khadse : रोहिणी खडसे पोलिसांच्या ताब्यात; काळ्या झेंड्यांच्या धास्तीने कारवाई

Rohini Khadse : रोहिणी खडसे पोलिसांच्या ताब्यात; काळ्या झेंड्यांच्या धास्तीने कारवाई

Subscribe

 

जळगावः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्याच्या तयारीत असलेल्या रोहिणी खडसे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. रोहिणी खडसे यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अन्य काही पदाधिकाऱ्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं.

- Advertisement -

शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस हे आज जळगावमध्ये होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवणार होते. त्याआधीच पोलिसांनी त्यांना व राष्ट्रवादीच्या अन्य पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयाबाहेरही पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता.

हेही वाचाःआपले सांगाडे बाहेर निघतील हे लक्षात आल्यामुळे…; फडणवीसांनी पाटण्यातील बैठकीवर साधला निशाणा

- Advertisement -

कापूस प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवणार असल्याचा इशारा एकनाथ खडसे यांनी दिला होता. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी रोहिणी खडसे व अन्य पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं.

रोहिणी खडसे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर एकनाथ खडसे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली. या सरकारची पोलिसांच्या मदतीने दडपशाही सुरु आहे. त्यांनी काळे झेंडे दाखवले नाहीत किंवा ते रस्त्यावरही उतरले नाहीत. ते सर्व राष्ट्रवादीच्या कार्यालयात असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. महिलांना उचलून घेऊन गेले. ही हुकुमशाही आहे की लोकशाही?, असा सवाल एकना खडसे यांनी केला.

दादागिरी कशी सहन करावी

आम्ही पक्ष कार्यालयात असताना पोलिसांनी आम्हाला उचलून नेलं. एवढी दादागिरी कशी सहन करावी. कारण आम्ही कोणतीही घोषणा दिली नव्हती किंवा काळे झेंडे दाखवले नव्हते, अशी प्रतिक्रिया रोहिणी खडसे यांनी पोलीस व्हॅनमधून जात असताना दिली.

जमिनीमध्ये तोंड काळ केलं नसतं तर…;

भाजपा नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार एकनाथ खडसे यांनी फडणवीसांना जळगावात आलात तर काळे झेंडे दाखवले जातील, असा इशारा दिला होता. याबाबत देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले की, जमिनीमध्ये जर त्यांनी तोंड काळ केलं नसतं तर त्यांना काळे झेंड दाखवायची वेळ थोडी आली असती, ते परिवारात राहिले असते.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -