ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रहाचे ठराविक वेळेनंतर राशीपरिवर्तन होते. येत्या मार्च महिन्यात भौतिक सुखाचा कारक असलेला शुक्र ग्रह 7 मार्च रोजी कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. जो 31 मार्चपर्यंत कुंभ राशीत असेल त्यानंतर त्याचे राशीपरिवर्तन मीन राशीत होईल. शुक्राच्या या राशीपरिवर्तनाचा प्रभाव सर्व राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल. काही राशींसाठी हे राशीवर्तन शुभ फळ देणारे असेल.
शुक्राच्या राशीपरिवर्तनाचा ‘या’ राशींना होणार फायदा
- मेष
शुक्राच्या राशीपरिवर्तनाचा प्रभाव मेष राशीच्या व्यक्तींना पाहायला मिळेल. या काळात तुम्हाला करिअरमध्ये खूप यश मिळेल. अनेक सुखांचा उपभोग घ्याल. नातेसंबंध मजबूत होतील. आर्थिक लाभ होतील.
- तूळ
तूळ राशीच्या व्यक्तींना देखील या राशीपरिवर्तनाचा फायदा होईल. आर्थिक परिस्थिती मजबूत राहिल. या काळात प्रत्येक कामात यश मिळेल. वैवाहिक जीवनात आनंद निर्माण होईल.
- मकर
शुक्र ग्रहाच्या राशीपरिवर्तनाने मकर राशीच्या व्यक्तींना देखील अनेक लाभ होतील. या काळात मालमत्तेतून फायदा होईल. नोकरी-व्यवसायात उप्तन्न वाढ होईल.
हेही वाचा :