घरमहाराष्ट्रSanjay Raut : आशिष शेलार यांच्या टीकेला संजय राऊतांचे प्रत्युत्तर, म्हणाले -...

Sanjay Raut : आशिष शेलार यांच्या टीकेला संजय राऊतांचे प्रत्युत्तर, म्हणाले – “जे स्वतः बांडगूळ…”

Subscribe

भाजपा आमदार आशिष शेलार यांच्या टीकेला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. जे स्वतः बांडगूळ आहेत, त्यांना इतरही तेच वाटतात, असा टोला राऊतांनी लगावला आहे.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. त्यातही शिवसेना ठाकरे गट आणि भाजपाकडून वारंवार एकमेकांवर टीका करण्यात येत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सामनातील अग्रलेखाच्या माध्यमातून वारंवार भाजपावर निशाणा साधला आहे. आजच्या सामनातील अग्रलेखातून भाजपा आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. यावरून भाजपा आमदार आशिष शेलार यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. संजय राऊतांचा उल्लेख त्यांनी ‘पत्रकार पोपटलाल’ असा केला आहे. शेलारांच्या या टीकेलाही आता राऊतांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. (Sanjay Raut’s answered to Ashish Shelar’s criticism)

हेही वाचा… Sanjay Raut :”…तर फडणवीसांनी राजीनामा द्यावा”, जरांगेंच्या आरोपांनंतर राऊत संतापले

- Advertisement -

भाजपा आमदार, मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी X या सोशल मीडिया साइटवरील त्यांच्या अकाउंटवरून “छोट्या मोठ्या 22 पक्षांना एकत्र घेऊन चालणारा पक्ष म्हणजे भाजपाच आणि तुमच्या पक्षा सारख्या बांडगूळाना दिल्ली दाखवली ती सुध्दा भाजपानेच !” असे लिहित टीका केली आहे. त्यांच्या या टीकेला राऊतांनी प्रसार माध्यमांसमोर उत्तर दिले आहे. पत्रकारांनी याबाबत प्रश्न विचारला असता राऊत म्हणाले की, जे स्वतः बांडगूळ आहेत, त्यांना इतरही तेच वाटतात. हे बांडगूळ अजित पवार आणि शिंदे गटाचे बांडगूळ आहेत आणि त्यांना लटकलेला भारतीय जनता पक्ष आहे. स्वतःवर जर का भाजपाला विश्वास असता तर त्यांनी असे लहान लहान पक्ष फोडून अपवित्र युती केली नसती, अशी टीका राऊतांनी केली.

हे आशिष शेलार काय बोलत आहेत. त्यांच्या पक्षात काय सुरू आहे, हे त्यांना माहीत आहे का? भाजपामध्ये सध्या अंतर्गत टोळी युद्ध सुरू आहे आणि या टोळी युद्धाचा लवकरच भडका उडणार आहे, असा दावाही संजय राऊतांनी यावेळी प्रसार माध्यमांसमोर केला आहे. भाजपामध्ये सगळ वरवर चांगल दिसत आहे. भाजपा हा एक पॉलिटिकल अंडरवर्ल्ड आहे. अजित पवारांनी लिहिले, विकासासाठी ते मोदींकडे गेले. एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांना समुद्रात डुबकी मारुन स्कूबा डायव्हींग कराव लागेल. अजित पवार कदाचित धरणात उडी मारतील, तिघेही मोदींचे फॉलोअर्स आहेत असा टोला राऊतांनी भाजपाला लगावला आहे.

- Advertisement -

तसेच, मोदींच्या स्कूबा डायव्हिंगवरही संजय राऊत यांनी टीका केली आहे. पुलावामा हल्ला झाला, तेव्हा मोदी जिम कॉर्बेटमध्ये फोटोग्राफीचा आनंद घेत होते. देशात मोठे संकट असते, तेव्हा मोदी संकट सोडवण्याऐवजी आयुष्याचा आनंद घेत असतात. शेतकरी गोळ्या झेलतायत, तेव्हा ते स्कूबा डायव्हिंगचा आनंद घेतायत, हाच त्यांचा विकास आहे. राहुल गांधींना तुम्ही बोलता, तुम्ही काय करत आहात, ते सांगा? असा प्रश्नही राऊतांनी यावेळी उपस्थित केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -