घरमहाराष्ट्रSupriya Sule : मतं मागायला मी स्वतः जाते, दुसऱ्याच्या भरवशावर नाही, सुप्रिया...

Supriya Sule : मतं मागायला मी स्वतः जाते, दुसऱ्याच्या भरवशावर नाही, सुप्रिया सुळेंचा रोख कुणाकडे ?

Subscribe

बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा अटीतटीची निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्याचे संकेत आतापासूनच मिळत आहेत. राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर तर याची जास्तच चर्चा आहे. पूर्वापार या मतदारसंघात पवार कुटुंबियांचे वर्चस्व आहे. येथील विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उभ्या राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील राजकीय वातावरण आतापासूनच तापायला लागले आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा अटीतटीची लढत होणार आहे. येथे भावजय आणि नणंद एकमेकांविरोधात उभ्या ठाकण्याची शक्यता आहे. त्यानिमित्ताने सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांनी प्रचारालाही सुरुवात केली आहे. विविध गावात सुनेत्रा पवार भेटी देत आहेत. तसंच, एकमेकांना आव्हाने-प्रतिआव्हानेही दिली जात आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवारांना टोला लागवला आहे. एका सभेत त्या बोलत होत्या.

- Advertisement -

हेही वाचा – Manoj Jarange: इंटरनेट बंद, एसटी सेवाही ठप्प; जरांगेंच्या आंदोलनामुळे ‘या’ जिल्ह्यांत तणाव

‘मतं मागायला सदानंद सुळेंना फिरवत नाही’

“मी तुमची लोकप्रतिनिधी आहे. तुम्ही म्हणाल ते मी करायचं आहे. तुम्हाला महागाई, बेरोजगाई वाटते तर मी त्यावर बोललं पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा गांभीर्याने विचार करा. आपल्या सुखदुःखात जो सहभागी होत असेल, अशाच लोकांना मतदान करा. मी मतं मागतेय ती मेरिटवर मागतेय. माझ्यासाठी मतं मागायला सदानंद सुळेंना फिरवत नाही. गाव-वाडी-वस्तीवर मी फिरतेय. आणि असंच असलं पाहिजे”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. या आडून सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवारांना टोला लागवल्याची चर्चा सुरू आहे.

- Advertisement -

जो स्वतः सभागृहात उभा राहील, त्यांनाच मत द्या

“माझी खासदारकी ही माझी आहे. माझ्या नवऱ्याने लुडबूड करण्याची गरज नाही. त्यांनी मुंबईतलं बघायचं आणि मी इथलं बघायचं, असं आमचं ठरलं आहे. अशा लोकांना मतदान करा जो स्वतः सभागृहाच उभा राहिल”, असं आवाहनही त्यांनी केलं.

हेही वाचा – Farooq Abdullah : काश्मीर हा भारताचाच, अब्दुल्ला थेटच म्हणाले

मी कॉपी करून पास होणार नाही

“मला हा वारसा घराणेशाहीने मिळालेला नाही. २००९ मध्ये मी पहिली लोकसभा निवडणूक लढले. पण त्याआधी मी २ वर्षे मतदारसंघ फिरले. गाव-वाडी-वस्तीवर जाऊन लोकांशी संवाद साधला. मी सुप्रिया सुळे आहे, स्वतः लिहेन आणि पास होईन, तेही स्वतःच्या मेहनतीने”, असंही त्या म्हणाल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -