Tuesday, May 7, 2024
घरमानिनीHealthकॉन्टॅक्ट लेन्सचे दुष्परिणाम 'या' प्रकारे टाळा...

कॉन्टॅक्ट लेन्सचे दुष्परिणाम ‘या’ प्रकारे टाळा…

Subscribe

कॉन्टॅक्ट लेन्स वापरणे जितके सोपे वाटते तितकेच त्यांचे दुष्परिणाम माहित असले पाहिजे. नाहीत तर तितकेच घातक ठरू शकतात. तज्ज्ञांच्या मते, कॉन्टॅक्ट लेन्स वापरण्यात निष्काळजीपणामुळे डोळ्यांच्या अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. यासाठी तुम्ही योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे. फॅशनसाठी कॉन्टॅक्ट लेन्स घालायला आवडत असतील तर त्याचे दुष्परिणाम सुद्धा लक्षात घ्यायला हवेत. यासोबतच डोळ्यांना वेगळा लूक देण्यासाठी महिला वेगवेगळ्या प्रकारच्या रंगीत कॉन्टॅक्ट लेन्स घालतात. तसेच आता मेकअप प्रोडक्ट म्हणून मोठ्या प्रमाणात कॉन्टॅक्ट लेन्स वापरली जात आहे. तर ही लेन्स वापरताना कशाप्रकारे काळजी घ्यायला हवी हे पाहुयात…

10 Tips for Avoiding Eye Infections: Smart Eye Care: Ophthalmologists

  • कॉन्टॅक्ट लेन्सचे दुष्परिणाम टाळण्यासाठी, नेत्रतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार त्यांचा वापर करा.
  • कॉन्टॅक्ट लेन्स नियमितपणे साफ करण्यासोबतच तुम्ही लेन्स बॉक्स नियमितपणे बदलत राहा.
  • लेन्स स्वच्छ करण्यासाठी आजकाल बाजारात अनेक प्रकारचे कॉन्टॅक्ट लेन्स सोल्यूशन्स उपलब्ध आहेत त्याचा वापर करा.
  • याशिवाय तुम्ही हायड्रोजन पेरॉक्साइडने देखील लेन्स स्वच्छ करू शकता.
  • कॉन्टॅक्ट लेन्स घालण्यापूर्वी आपले हात पाण्याने चांगले धुवा, जेणेकरून कोणत्याही प्रकारच्या जीवाणू किंवा विषाणूजन्य संसर्गाचा धोका होणार नाही.
  • लेन्स ओले करण्यासाठी कधीही नळाचे पाणी वापरू नका.
  • लेन्सचा संसर्ग टाळण्यासाठी, आंघोळ करताना आणि झोपताना लेन्स काढून टाकणे महत्वाचे आहे.
  • तसेच स्विमिंग, राफ्टिंग आणि इतर पाण्याचे खेळ करताना लेन्सचा वापर टाळावा.
  • लेन्स नियमित साफ करणे तुमच्यासाठी शक्य नसेल तर तुम्ही डिस्पोजेबल लेन्स वापरू शकता.
  • महिलांनी मेकअप करण्यापूर्वी लेन्स वापरावी आणि मेकअप काढण्यापूर्वी लेन्स काढून टाकावी.
  • लेन्स घालताना, तुमच्या नखांमुळे कॉर्निया किंवा कॉन्टॅक्टला कोणतेही नुकसान होणार नाही याची काळजी घ्या.
  • लेन्समुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी, डॉक्टरांनी सांगितलेल्या कालावधीपेक्षा जास्त काळ त्यांचा वापर करणे टाळा.
  • सर्व खबरदारी घेऊनही, लेन्सच्या वापरामुळे तुम्हाला तुमच्या डोळ्यांमध्ये कोणत्याही प्रकारची समस्या येत असेल, तर तुम्ही नेत्रतज्ज्ञांशी संपर्क साधावा.

हेही वाचा : तुम्ही देखील कमी पाणी पिता? होऊ शकतात गंभीर परिणाम

- Advertisment -

Manini