Thursday, May 2, 2024
घरमानिनीHealthलंचवेळी हे फूड्स खाणे टाळा

लंचवेळी हे फूड्स खाणे टाळा

Subscribe

वजन कमी करणे सहज शक्य होत नाही. यासाठी डाएट आणि व्यायाम फार महत्त्वाचा मानला जातो. कोरोना व्हारसच्या संकटानंतर वजन वाढण्याची समस्या अधिक वाढली गेली आहे. खरंतर वजन कमी करण्यासाठी डाएट फार महत्त्वाचे आहे. मात्र लंचवेळी काही असे फूड्स खाणे टाळले पाहिजेत अन्यथा लठ्ठपणा वाढला जाऊ शकतो. त्यामुळे लंचवेळी कोणते फूड्स खाणे टाळले पाहिजेत हे पाहूयात.(avoid this food during lunch)

-कार्बोहाइड्रेट रिच फूड्स 

- Advertisement -


जी लोक दुपारी अधिक कार्बोहाइड्रेट असणारे फूड्स खातात त्यांचे वजन वेगाने वाढते. त्यामुळे तुम्ही असे फूड्स खाणे टाळा ज्यामध्ये कार्ब्सचे प्रमाण अधिक असते. त्याऐवजी तुम्ही प्रोटीन रिच डाएट खाऊ शकता. जसे की, अंडी, डाळं आणि मासे.

-ब्रेड सँन्डविच

- Advertisement -


काही वेळेस आपण आपल्याकडे अधिक वेळ नसेल तर लंचमध्ये ब्रेड किंवा सँन्डविच खातो. भले ते टेस्टी असतात. मात्र आरोग्यासाठी धोकादायक ठरेल. यामुळे शरिरातील फॅट वाढते. काही सँन्डविचमध्ये चीज आणि सॅच्युरेटेड फॅटचा वापर केला जातो. त्यामुळे तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर लंचवेळी सँन्डविच खाणे टाळा.

-डब्बा बंद फळं किंवा भाज्या


सध्या बदलत्या ट्रेंन्डमुळे डब्बाबंद फळं-भाज्यांचे सेवन केले जाते. धावपळीच्या लाइफस्टाइलमध्ये ते सोबत घेऊन जाणे सुद्धा सोप्पे असते. फळं-भाज्या आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात आणि त्यामधून आपल्याला फायबर, व्हिटॅमिन्स आणि अँन्टिऑक्सिडेंट मिळतात. मात्र याचा लाभ तेव्हाच होतो जेव्हा ते ताजे असतात. जर डब्बाबंद फूड्सच्या रुपात ते खाल्ल्यास पोषक तत्त्व कमी होतील आणि वजन ही कमी होण्यास मदत होणार नाही.


हेही वाचा- नॉन व्हेज नाही खाल्ल तर काय होत?

- Advertisment -

Manini