घरमहाराष्ट्रअजित पवार मुख्यमंत्री झाले तर पुतण्या म्हणून मलाही आनंद होईल - रोहित...

अजित पवार मुख्यमंत्री झाले तर पुतण्या म्हणून मलाही आनंद होईल – रोहित पवार

Subscribe

मुंबई | ‘अजित पवार मुख्यमंत्री झाले तर पुतण्या म्हणून मलाही आनंद होईल’, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी दिली आहे. अजित पवार यांनी बंड करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. यानंतर अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री झाले आहेत. पण अजित पवार सत्तेत गेल्यापासून ते मुख्यमंत्री होण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळता रंगल्या आहेत. ‘एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहणार’, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. तरी देखील अजित पवार यांच्या मुख्यमंत्री होण्याचा चर्चा काही थांबत नाहीत.

यासंदर्भात अजित पवार हे मुख्यमंत्री होतील का? त्याचे पुतणे रोहित पवार यांना देखील पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, “अजित पवार मुख्यमंत्री झाले तर पुतण्या म्हणून मलाही त्याचा आनंद होईल. पण आजपर्यंत ज्या विचारांच्या विरोधात आपण काम करत आलो. त्याच्या विचाराबरोबर ते मुख्यमंत्री झाले तर एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून मला नाराजी वाटेल. पण भाजप हे खूप हुशार आहे. कारण, अजित पवार हे सत्तेत आल्यापासून मुख्यमंत्री होण्याची इच्छेबद्दल माध्यमांशी बोललले नाहीत. पण ज्या वावड्या उडवल्या जात आहेत. त्या आसपासच्या लोकांकडून उठविल्या जात आहेत,” असा आरोपही रोहित पवारांनी भाजपवर केला.

- Advertisement -

हेही वाचा – “अजित पवार आज ना उद्या मुख्यमंत्री होतील”, प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला विश्वास

अजित पवार आज ना उद्या मुख्यमंत्री होतील – प्रफुल्ल पटेल

तसेच अजित पवार गटाचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी नेते प्रफुल्ल पटेल यांना देखील पत्रकारांनी अजित पवार यांच्या मुख्यमंत्री पदाच्या चर्चेसंदर्भात प्रश्न केल्यावर ते म्हणाले ‘अजित पवार आज ना उद्या मुख्यमंत्री होतील’, असा विश्वास प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला होता. “आज ती जागा रिकामी नाही मग चर्चा कशासाठी करता. अजितदादा हे महाराष्ट्रातील एक वजनदार आणि लोकप्रिय नेते आहेत. ते आमच्या पक्षाचे नेतृत्व आज नाही तर अनेक वर्षापासून करत आहेत. काम करणाऱ्या माणसाला आज नाही, उद्या नाही परवा संधी मिळत असते आणि अनेक लोकांना संधी मिळालेली आहे. अजित दादांना आज नाही. पण पुढच्या काळात नक्कीच कधी ना कधी संधी मिळले आणि आम्ही त्या दिशेने काम करू”, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – Devendra Fadnvis : मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेच; देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा केलं स्पष्ट

एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहणार – देवेंद्र फडणवीस

सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. यात राज्यातील समस्येवर चर्चा होण्यापेक्षा अजित पवार मुख्यमंत्री होणार का? यावर चर्चा रंगली आहे. यासंदर्भात फडणवीस म्हणाले, “मुख्यमंत्री बदलाची कोणतीही चर्चा नाही. त्यामुळे जे लोके अशाप्रकारचे वक्तव्य करत आहेत त्यांना माझे स्पष्टपणे सांगणे आहे की, अशा प्रकारचे संकेत देणे किंवा संभ्रम निर्माण करणे, त्यांनी तत्काळ बंद करावे. कारण महायुती संदर्भात लोकांच्या मनात संभ्रम तयार होईल, पण नेत्यांच्या मनात कोणताही संभ्रम नाही. एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहणार असल्यामुळे कार्यकर्त्यांनी संभ्रमात राहू नये”,असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -