Tuesday, October 3, 2023
घर मानिनी Beauty मेकअप करताना 'या' चुका करणे टाळा

मेकअप करताना ‘या’ चुका करणे टाळा

Subscribe

आजकाल प्रत्येकालाच मेकअप करणे आवडते. लग्न सोहळा असो किंवा एखादे पार्टी फंक्शन त्यावेळी तुम्ही मेकअप केला जातो. मेकअप केल्याने तुम्ही सुंदरच नव्हे तर आकर्षक ही दिसता. मेकअप केल्याने तुमचे सौंदर्य खुलले जाते. परंतु मेकअप करताना पुढील काही चुका करणे टाळले पाहिजे.

-गरजेपेक्षा अधिक फाउंडेशन लावणे
काहीवेळेस अधिक सुंदर दिसण्यासाठी काही महिला चेहऱ्यावर गरजेपेक्षा अधिक फाउंडेशन लावले जाते. असे केल्याने तुम्हाला एजिंगची समस्या वाढू शकते. जर अधिक फाउंडेशन लावत असाल तर स्किन अधिक सफेद दिसते आणि काही वेळानंतर चेहऱ्यावर फाइन लाइन्स येतात.

- Advertisement -

-लिपस्टिकची चुकीची शेड
लिपस्टिकच्या सर्व शेड्स सर्वच स्किनवर सूट होत नाहीत. लिपस्टिकच्या अशा काही शेड्स असतात ज्या तुम्ही तुमच्या स्किन टोननुसार निवडल्या पाहिजेत. अधिक डार्क लिपस्टिक अजिबात लावू नका.

-डोळ्यांच्या आसपास रंग
मेकअप करताना लिपस्टिक प्रमाणेच आय मेकअप सुद्धा व्यवस्थितीत करावा. अन्यथा तुम्ही वयाने अधिक दिसू शकता. चुकीची आय शेड्स निवडल्यास तुमचा मेकअप बिघडू शकतो.

- Advertisement -

-स्किन ड्राय होणे 
जर तुम्ही ड्राय स्किनवर मेकअप केल्यास तर यामुळे मेकअप चेहऱ्यावर व्यवस्थितीत बसू शकत नाही. अशातच गरजेचे आहे की, तुम्ही मेकअपपूर्वी चेहऱ्याला मॉइश्चराइजर लावा.


हेही वाचा- काजळ लावताना ‘या’ टिप्स वापरा,वाढेल तुमचे सौंदर्य…

 

- Advertisment -

Manini