घर मनोरंजन हिजाब घालून उमराहसाठी राखी रवाना; व्हिडीओ व्हायरल

हिजाब घालून उमराहसाठी राखी रवाना; व्हिडीओ व्हायरल

Subscribe

बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत नेहमीच तिच्या खासगी आयुष्येमुळे चर्चेत असते. काही महिन्यांपूर्वी झालेल्या आदिलसोबतच्या घटस्फोटानंतर राखीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ज्यातून तिने आदिलवर अनेक आरोप केले होते. त्यानंतर आदिल तुरुंगात गेला होता. नुकत्याच काही दिवसांपूर्वी आदिल तुरुंगातून बाहेर आला आणि त्याने राखीवर अनेक गंभीर आरोप केले. याचदरम्यान, राखी आपला पहिला उमराह करण्यासाठी मुंबईहून रवाना झाली आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

- Advertisement -

25 ऑगस्टच्या सकाळी राखी आपला पहिला उमराह करण्यासाठी मुंबईहून रवाना झाली आहे. नुकताच तिचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये ती फ्लाईटमध्ये बसलेली दिसत आहे. यावेळी राखीने हिजाब आणि प्रिंटेड फुल स्लीव्हज लांब ड्रेस परिधान केला आहे. यामध्ये राखी म्हणतेय की, “मी खूप भाग्यवान आहे की, आज मी पहिल्यांदा उमराहला जात आहे. मला बोलावण्यात आले आहे. मी खूप आनंदी आहे. तुम्ही सर्व मला तुमच्या प्रार्थनांमध्ये ठेवा. मी सर्वांसाठी प्रार्थना करेन.”

आदिलसाठी राखीने बदलला होता धर्म

राखी सावंतने गेल्या वर्षी मे महिन्यात आदिल खानसोबत गुपचूप लग्न केले होते, ज्याची माहिती तिने सात महिन्यांनंतर जानेवारी 2023 मध्ये दिली होती. आदिलसोबत लग्न करण्यासाठी तिने इस्लाम धर्म स्वीकारला आणि तिचे नाव बदलून फातिमा ठेवल्याचा खुलासाही राखीने केला होता.

- Advertisement -

 


हेही वाचा :  राष्ट्रीय पुरस्कार पटकावताच अल्लू अर्जुनच्या घरी टीमचे सेलिब्रेशन; व्हिडीओ व्हायरल

- Advertisment -