घरमहाराष्ट्रदेवाने आशीर्वाद दिला म्हणजे...; शरद पवारांच्या 'त्या' वक्तव्यावर धनंजय मुंडेंनी मानले आभार

देवाने आशीर्वाद दिला म्हणजे…; शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर धनंजय मुंडेंनी मानले आभार

Subscribe

अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंडखोरी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. मात्र गुरूवारी (24 ऑगस्ट) राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी अजित पवार आमचे नेते आहेत. पक्षात कोणतीही फूट पडली नसल्याचा दावा केला होता. यानंतर आज शरद पवार यांनी सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याला दुजारा दिल्याची चर्चा सकाळी सुरू झाली आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. शरद पवारांच्या वक्तव्यानंतर मित्रपक्ष असलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून टीका व्हायला सुरूवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर बंडखोर अजित पवार गटातील नेते व राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी शरद पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. देवाने आशीर्वाद दिला म्हणजे देव आपल्या आजूबाजूलाच असतो, असे वक्तव्य केलं आहे. ते आज (25 ऑगस्ट) पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत होते. (God blessed means Dhananjay Munde thanked Sharad Pawar for that statement)

हेही वाचा – शरद पवारांचे ‘त्या’ वक्तव्यावरून घुमजाव, म्हणाले – “मी असे…”

- Advertisement -

धनंजय मुंडे म्हणाले की, मी त्यांच्या वक्तव्यावर बोलणं उचित नाही. आम्ही आमच्या देवाला गेल्या अनेक दिवसांपासून एवढंच म्हणतं होतो की, कामाच्या माणसाला आशीर्वाद द्या आणि आमच्या देवाने आमचं ऐकले आहे. आम्ही त्यांचे आभार मानतो. आमच्या भावना त्यांनी समजून घेतल्या आहेत. देवाने आशीर्वाद दिला म्हणजे देव आपल्या आजूबाजूलाच असतो. आमची प्रार्थना भगवंतांनी ऐकली आहे. पक्षातील बहुसंख्य लोकांची हीच इच्छा होती. आमच्या देवाने आमचे ऐकले आहे, असे धनंजय मुंडे म्हणाले.

बीडची सभा उत्तर सभा नाही तर…

बीडमध्ये शरद पवारांनी सभा घेतल्यानंतर अजित पवार गटाकडूनही याठिकाणी सभेचे आयोजन करण्यात आलं आहे. याचपार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, बीडची सभा ही उत्तर सभा नाही, तर त्याठिकाणी असलेल्या विविध प्रश्नावर सभा होणार आहे. मराठवाड्यातील दुष्काळाची दाहकता सर्वांच्या लक्षात येत आहे. दोन जिल्ह्यात अतिवृष्टी तर सहा जिल्ह्यात परिस्थिती गंभीर आहे. पाऊस नसल्याने पीकं करपून चालली आहेत. पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न तसेच पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होणार आहे. या सर्व बाबींवर हे सरकार अतिशय गंभीर असल्यामुळे आढावा बैठक घेत आहे. मी कृषीमंत्री म्हणून, अनेक जिल्ह्यांचे पालकमंत्री दुष्काळावरील या बैठकीत सहभागी होणार आहेत, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली.

- Advertisement -

हेही वाचा – ‘ही फूट नाही तर काय’? राऊतांचा थेट शरद पवारांना प्रश्न

शरद पवार काय म्हणाले होते?

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठलीही फुट पडलेली नाही. आमच्यापैकी काही लोकांनी एक वेगळा निर्णय घेतलेला आहे. त्यांच्या निर्णयाबद्दल आम्ही लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार केली आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी (24 ऑगस्ट) केले होते. यानंतर आज सकाळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रावादी पक्षात फूट पडलेली नाही, पक्षात फूट तेव्हा पडते, जेव्हा एक मोठा गट बाहेर पडतो. अजित पवार हे आमचेच नेते आहेत. फक्त एक गट पक्ष सोडून गेला म्हणजे फूट पडली, असे होत नाही, असे वक्तव्य केल्याची चर्चा होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -