Sunday, September 24, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Health रात्री आंघोळ करावी का?

रात्री आंघोळ करावी का?

Subscribe

बहुतांशजण असे म्हणतात की, रात्रीच्या वेळी आंघोळ केल्याने आपली तब्येत बिघडू शकते. यामुळे बहुतांशजण रात्रीच्या वेळी आंघोळ करणे टाळतात. मात्र खरंच असे केल्याने आपली तब्येत बिघडते का? या बद्दल तज्ञ काय म्हणतायत हे जाणून घेऊयात. (Bathing in night)

एक्सपर्ट्स असे म्हणतात की, जर तुम्हाला रात्री खुप थकलेले किंवा सुस्ती आल्यासारखे वाटत असेल तर अशावेळी आंघोळ करणे बेस्ट पर्याय आहे. यामुळे मानसिक आरोग्य उत्तम होऊ शकते. त्याचसोबत तुमच्या शरीरातील थकवा दूर होऊ शकते. यामुळे तुम्हाला शांत झोप ही लागू शकते. जर वातावरणात अधिक गारवा असेल आणि तुमची तब्येत ठीक नसेल तर अशा स्थितीत रात्रीच्या वेळी आंघोळ करणे टाळले पाहिजे. अन्यथा तुमची तब्येत बिघडली जाऊ शकते. सामान्य स्थितीत रात्रीच्या वेळी तुम्ही आंघोळ करू शकता. असे केल्याने तुमच्या आरोग्याला काही फायदे होऊ शकतात.

- Advertisement -

रात्रीच्या वेळी आंघोळ केल्याने होणारे फायदे
रात्रीच्या वेळी उन्हाळ्यात किंवा दिवसात अथवा शरीरातून अधिक घाम येत असेल तर आंघोळ जरुर करावी. यामुळे तुम्ही काही प्रकारच्या समस्येपासून दूर राहू शकता.

एक्नेपासून रहाल दूर
दिवसभर घाम येण्याच्या कारणास्तव तुमच्या चेहऱ्यावर एक्ने किंवा पिंपल्स येऊ शकतात. अशा स्थितीत रात्रीच्या वेळी आंघोळ करणे फायदेशीर ठरू शकते. या व्यतिरिक्त दिवसभर अस्वच्छ झालेले शरीर ही स्वच्छ होईल.

- Advertisement -

तणाव कमी होईल
दिवसभरचा थकवा आणि घामामुळे रात्रीच्या वेळी आंघोळ करणे हेल्दी ऑप्शन आहे. यामुळे मानसिक आणि शारीरीक तणाव कमी होऊ शकतो. त्याचसोबत तुम्हाला उत्तम झोप ही लागू शकते.

रात्रीच्या वेळी नक्की कधी आंघोळ करावी?
-एक्सपर्ट्स असे म्हणतात की, जर तुम्हाला सर्दी-खोकल्याची समस्या असेल तर रात्रीच्या वेळी आंघोळ करणे टाळा
-थंडीच्या वेळी थंड पाण्याने आंघोळ करू नका. या दरम्यान जर तुम्हाला थकवा जाणवत असेल तर गरम पाण्याने आंघोळ करा
-लहान मुलांना रात्रीच्या वेळी आंघोळ घालू नका
-एखादी एलर्जी झाली असेल तर रात्रीच्या वेळेस आंघोळ करणे टाळा


हेही वाचा- डोकेदुखीच्या समस्येपासून आराम देतील ‘हे’ फूड्स

- Advertisment -

Manini