Tuesday, September 26, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Relationship Big fat wedding मुळे वैवाहिक नात्याला धोका, अभ्यासातून खुलासा

Big fat wedding मुळे वैवाहिक नात्याला धोका, अभ्यासातून खुलासा

Subscribe

प्रत्येकालाच आपले लग्न ग्रँन्ड स्टाइमध्ये व्हावे असे वाटत असते. त्यासाठी ते डोळेबंद करून त्यासाठी पैसे खर्च करतात. अशातच तुम्ही सुद्धा आलिशान पद्धतीने प्लॅन करत असाल तर अभ्यासातून असा काही खुलासा झाला आहे त्याचा थेट परिणाम तुमच्या वैवाहिक आयुष्यावर होतो. अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की, बिग फॅट वेडिंग तुलनात्मक रुपात कमी बजेट असणाऱ्या लग्नापेक्षा कमी काळ चालतात.

- Advertisement -

लग्नाच्या खर्चासंदर्भातील अभ्यास अमेरिकेतील 3 हजारांपेक्षा अधिक वैवाहिक कपल्सवर करण्यात आला. याच्या माध्यमातून समोर आलेल्या परिणामांवरुन कळते की, व्यक्तिला आपल्या लग्नासाठी फार कमी खर्च करावा. असे न करणारे कपल्स सर्वसामान्यपणे आपल्या नात्यात कमी आनंदित दिसतात. या व्यतिरिक्त बिग फॅट वेडिंगसाठी खर्च करणाऱ्या कपल्समध्ये घटस्फोट होण्याची शक्यता अधिक होती असे ही अभ्यासातून समोर आले.

- Advertisement -

लग्नासाठी भले खर्च खुप केला नसेल. मात्र अभ्यासात असे समोर आले की, अभ्यासातून असे दिसून आले आहे की हनीमूनला जाणे हे घटस्फोटाच्या कमी जोखमीशी संबंधित आहे. अशातच कपल्सने लग्नाऐवजी आरामात सुट्ट्या घालवण्यासाठी अधिक खर्च केला पाहिजे. हनीमून ही एक उत्तम वेळ असते त्यावेळी कपल्सला आपल्या आयुष्यासंदर्भातील जबाबदाऱ्या कळतात.


हेही वाचा- मुलं ‘या’ कारणासाठी करतात लग्न

- Advertisment -

Manini