घरठाणेमुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात मुक्याजीवांची घेतली जातेय काळजी, पालिकेकडून 326 प्राण्यांना जीवदान

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात मुक्याजीवांची घेतली जातेय काळजी, पालिकेकडून 326 प्राण्यांना जीवदान

Subscribe

ठाणे : आपत्ती कोणावर कधी येईल हे सांगता येत नाही, मग तो मनुष्यप्राणी असो या मुकाजीव असो. अशाच 326 मुक्याजीव वर्षभरात संकटात सापडले होते. या मुक्याजीवांच्या मदतीला ठाणे महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग वेळीच धावल्याने त्यांना जीवदान दिले आणि या कृतीतून, मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात मुक्याजीवांची काळजी घेतली जाते हे दाखवून दिले.

हेही वाचा – अजित पवार यांच्यासोबत मतभेद असल्याच्या चर्चांवर जयंत पाटलांचं सूचक वक्तव्य; म्हणाले…

- Advertisement -

ठामपा आपत्ती व्यवस्थापन कक्षामधील दूरध्वनी वर्षाचे बारा महिने खणखणत असतो. अहो साहेब, येथे झाड पडले किंवा अपघात झाला आहे…. साहेब, उंच झाडाला किंवा विजेच्या खांब्याला कावळा, कबुतर अडकले आहे… नाल्यात कुत्रा अडकून पडला आहे…, असे फोन दररोज चालूच असतात. कुत्री- मांजरी, गुरे किंवा कावळा- कबुतर यांच्या येणाऱ्या तक्रारींची अन्य तक्रारींमध्ये नोंद केली जाते. अशाप्रकारे 1 जानेवारीपासून 19 ऑगस्टपर्यंत तब्बल 326 तक्रारी आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये नोंदवल्या गेल्या आहेत. यामध्ये 193 तक्रारी प्राणी आणि 133 तक्रारी पक्ष्यांसंदर्भात आहेत.

पहिल्या पाच महिन्यांत एकूण तक्रारींपैकी 228 तक्रारींचा समावेश आहे. म्हणजेच, पावसाळ्यापेक्षा उन्हाळ्यात जीवदान देत मोलाचे कार्य करत माणुसकी जपण्याचा या विभागाने प्रामाणिकपणे प्रयत्न केल्याचे दिसत आहे. मानवी जीवाप्रमाणे मुकाजीवही तितकाच महत्वाचा आहे. या कक्षात येणाऱ्या प्रत्येक तक्रारीची येथे नोंद केली जाते. तसेच प्रत्येक तक्रारीनुसार त्याबाबत घटनास्थळी जाऊन खातजमा केली जाते. मुक्याजीवांना वेळप्रसंगी रुग्णालयात दाखल केले जाते. हे आमचे काम आहे ते आम्ही करत आहोत, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

- Advertisement -

हेही वाचा – “महाराष्ट्र सैनिक म्हणवतात त्यांनी स्वतःला प्रश्न विचारायला हवा…”; ‘या’ मंत्र्यांची राज ठाकरेंवर टीका

पाण्याच्या प्रवाहात वाहणाऱ्या म्हशीला जीवदान
ठाणे शहरात 27 जुलै 2023 रोजी दुपारी दीड वाजल्यापासून सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत म्हणजे सात तासात 137.12 मिमी पाऊस झाला होता. त्यामुळे ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचण्याबरोबर नाल्यातील पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाहत होता. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घोडबंदर रोड, आनंद नगर येथील मुच्छला कॉलेजजवळील नाल्यामध्ये एक म्हैस पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत येऊन नाल्यात अडकली होती. आपत्ती व्यवस्थापन कक्षाने तिला सुखरूप बाहेर काढत जीवदान दिले.

वर्षभरातील मुक्याजीवांसंबंधींच्या तक्रारी (महिने, प्राणी आणि पक्षी या क्रमाने) –

    • जानेवारी – 26 – 35
    • फेब्रुवारी – 22 – 14
    • मार्च – 30 – 17
    • एप्रिल – 30 – 17
    • मे – 22 – 15
    • जून – 20 – 16
    • जुलै – 28 – 13
    • 19 ऑगस्ट – 15 – 06
    • एकूण – 193 – 133

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -