Saturday, April 27, 2024
घरमानिनीब्रह्ममुहूर्त म्हणजे काय? या वेळेत उठण्याचे फायदे जाणून घ्या

ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय? या वेळेत उठण्याचे फायदे जाणून घ्या

Subscribe

चंदा मांडवकर :

हिंदू धर्मात ब्रह्म मुहूर्ताचे विशेष महत्व सांगितले गेले आहे. धार्मिक शास्र, वेद पुराण आणि आपल्या ऋषीमुनींनी सुद्धा ब्रह्म मुहूर्तावर उठणे अत्यंत लाभदायक असल्याचे म्हटले आहे. जर तुम्ही सुद्धा ब्रह्म मुहूतावेळी उठत असाल तर तुम्हाला सौंदर्य, बळ, विद्या, बुद्धी आणि आरोग्याची प्राप्ती होते. तसेच तुमचा संपूर्ण दिवस हा उर्जेने भरलेला राहतो. कामात यश मिळते. सर्वात महत्वाचे म्हणजे ब्रह्म मुहूर्तावेळी पूजा-पाठ करत असाल तर तुमची प्रार्थना थेट देवापर्यंत पोहचली जाते असे ही मानले जाते. तर पाहूयात ब्रह्ममुहूर्त म्हणजे नक्की काय? तसेच या वेळेत उठण्याचे काय फायदे होतात त्याबद्दलच अधिक.

- Advertisement -

ब्रह्म मुहूर्त में जागने के फायदे - Brahma Muhurta Mein Jagne Ke Fayde »  Hindusthani.in

ब्रह्म मुहूर्त म्हणजे काय? ब्रह्म अर्थात परमात्मा आणि मुहूर्त म्हणजे वेळ. तर ब्रह्ममुहूर्त म्हणजेच परमात्म्याची वेळ. ही वेळ म्हणजे मध्यरात्रीच्या मधला काळ. पहाटे ४ ते ५.३० दरम्यानच्या वेळेला ब्रह्ममुहूर्त असे म्हटले जाते. तर ब्रह्म मुहूर्त हा रात्रीचा चौथा प्रहर असतो.

- Advertisement -

ब्रह्म मुहूर्ताचे महत्व काय?

The Importance of Brahma Muhurta - The Ambrosial Hours

हिंदू धर्मात ब्रह्म मुहूर्त सर्वाधिक उत्तम मानला गेला आहे. पौराणिक काळात जे ऋषीमुनी असायचे ते ध्यान करण्यासाठी बसण्यासाठीची ही वेळ योग्य मानायचे. यावेळी करण्यात आलेल्या देवाच्या पुजेचे फळ लवकर प्राप्त होते. मंदिरांचे दरवाजे ही ब्रह्म मुहूर्तावेळी उघडले जातात. पुराणांनुसार, या वेळी झोपल्यास ब्रम्ह मुहूताचे पुण्य नष्ट होते.

ब्रह्म मुहूतावेळी उठण्याचे ‘हे’ होतात फायदे

Aaj Ka Panchang, October 16, 2022: Check Out Tithi, Shubh Muhurat, Rahu  Kaal and Other Details for Sunday

  • धार्मिक मान्यतेनुसार, यावेळी देवता आणि पितर आपल्या घरी येतात. त्यामुळे आपल्या घराची उन्नती होते. -ब्रम्ह मुहूर्तावेळी संपूर्ण वातावरणात सकारात्मक उर्जा असले. ही उर्जा जर आपल्या शरिरातील उर्जेशी एकरुप झाल्यास मनात चांगले विचार येतात. आपण उत्साही राहतो. -ब्रह्म मुहूर्तावेळी उठणारी व्यक्ती आध्यात्मिक आणि नेहमीच आनंदी राहते. -ब्रह्म मुहूर्तावेळी करण्यात आलेली ध्यान साधना, आत्म विश्लेषण आणि ब्रह्म ज्ञानासाठी उत्तम वेळ मानली जाते.
  • यावेळी उठल्यास शरिरात उर्जा आणि सहनशक्ती निर्माण होते. – आयुर्वेदानुसार ब्रह्म मुहूर्तावेळी उठून बाहेर गेल्यास शुद्ध हवा आपल्या शरिरात जाते. -ब्रह्म मुहूर्तावेळी उठणारी व्यक्तीचे आरोग्य उत्तम राहतेच. पण बुद्धी आणि विद्या ही प्राप्त होते. – ब्रह्म मुहूर्तावेळी उठल्यास मानसिक तणाव, चिंता, अनिद्रा आणि निराशा सारख्या विविध समस्या दूर होतात. -शरिराला फिट आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठीची ही उत्तम वेळ मानली जाते.
  • ब्रह्म मुहूर्तावेळी उठल्यानंतर ‘या’ गोष्टी करा -ध्यान साधना करा – संध्या वंदन – देवाची प्रार्थना, पूजा-पाठ -अभ्यास
  • तर शीख धर्मात ब्रह्म मुहूर्ताला ‘अमृत वेला’ असे म्हटले जाते. आपण जसे पाहिले देवाच्या भक्तीसाठी सर्वश्रेष्ठ वेळ आहे. यावेळी आपले मन शांत आणि शरिर पवित्र होते. ब्रह्म मुहूर्तावेळी तुम्ही अचानक जरी उठलात तरीही त्यावेळी उठून तुमच्या इष्टदेवतेची पूजा करावी. याचे फळं ही तुम्हाला नक्कीच मिळते.

 


हेही वाचा :

तुम्ही सुद्धा पायात चांदीचे पैजण घालता तर ‘हे’ नक्कीच वाचा

- Advertisment -

Manini