Tuesday, September 26, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Health कपड्यांमुळे ही पडू शकता आजारी

कपड्यांमुळे ही पडू शकता आजारी

Subscribe

आपण सुंदर दिसावे म्हणून विविध प्रकारचे कपडे घालतो. या व्यतिरिक्त सर्दी-उन्हापासून दूर राहण्यासाठी ही कपडे फार महत्त्वाची भुमिका बजावतात. परंतु चुकीचे आपल्याला समस्येत टाकू शकतात. काही प्रकरणी तर अशा कपड्यांमुळे तुम्हाला अंगदुखीचा सुद्धा सामना करावा लागू शकतो. या व्यतिरिक्त तुम्ही आजारी पडू शकता.

-घट्ट कपडे

- Advertisement -


सध्या घट्ट कपडे घालण्याचा ट्रेंन्ड वाढला आहे. जीन्स ते बेल्ट आणि कंप्रेशन अंडरगार्मेंट्स सुद्धा घट्ट घालतात. मात्र असे कपडे विनाकारण समस्येचे कारण ठरू शकतात. घट्ट कपडे घातल्याने पोटावर दबाव पडतो, त्यामुळे इंट्रागॅस्ट्रिक प्रेशर किंवा इंट्रा-एब्डोमिनल प्रेशरच्या रुपात मानले जाते. एसिड रिफ्लक्सला ट्रिगर करू शकते. त्यामुळे हार्टबर्नची समस्या होते.

-कंप्रेशन अंडरगार्मेंट्स

- Advertisement -


सध्याच्या बिघडत्या लाइफस्टाइलमुळे काही लोक वाढते वजन आणि पोट येण्याच्या समस्येमुळे त्रस्त असतात. अशातच आपल्या आवडीचे कपडे घालण्यासाठी काही लोक कंप्रेशन अंडरगार्मेंट्स आणि कंट्रोल-टॉप पेंटीहोज जसे बॉडी शेपर्सचा वापर करतात. परंतु उत्तम फिगर दाखवण्यासाठी याचा वापर करणे हानिकारक ठरू शकते.

-सिंथेटिक कपडे

How to Wash Synthetic Fiber Clothes
बहुतांश लोक सिंथेटिक कापडाची निवड करतात.मात्र ज्यांची त्वचा अधिक संवेदनशील असते त्यांनी अशा प्रकारचे कपडे अजिबात घालू नये. त्याचसोबत ज्या लोकांना एलर्जीची समस्या असते त्यांनी सिंथेटिक कपडे घालू नयेत.


हेही वाचा- बॉडी शेप नुसार निवडा ड्रेस

- Advertisment -

Manini