Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र गणेशोत्सवात फळांचे दर स्थिर, भाविकांना दिलासा; जाणून घ्या काय भावाने मिळतात?

गणेशोत्सवात फळांचे दर स्थिर, भाविकांना दिलासा; जाणून घ्या काय भावाने मिळतात?

Subscribe

घराघरांत गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत. त्यामुळे बाप्पाच्या प्रसादासाठी वापरण्यात येणाऱ्या फळांच्या दरांमध्येही गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी फारशी वाढ न होता भाव स्थिर आहेत. त्यामुळे सध्याच्या वाढत्या महागाईमध्ये गणेशभक्तांना एकप्रकारे दिलासा मिळताना दिसत आहे.

उद्या गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे. घराघरांत गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत. त्यामुळे बाप्पाच्या प्रसादासाठी वापरण्यात येणाऱ्या फळांच्या दरांमध्येही गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी फारशी वाढ न होता भाव स्थिर आहेत. त्यामुळे सध्याच्या वाढत्या महागाईमध्ये गणेशभक्तांना एकप्रकारे दिलासा मिळताना दिसत आहे. (Fruit prices stable during Ganeshotsav relief for devotees Know apple orange and other fruits price)

मागच्या काही वर्षांपासून सर्वच वस्तूंचे दर सातत्यानं वाढत आहे. त्यामध्ये गहू, तांदूळ, डाळी विविध भाज्या आदी जीवनावश्यक वस्तूंबरोबर चैनीच्या वस्तूंचादेखील समावेश आहे. या वाढत जाणाऱ्या दरांमुळे सर्वसामान्यांचं जगणं कठीण झाल्याचंच चित्र आहे. परंतु गणपती बाप्पाला दाखवल्या जाणाऱ्या फळांचे दर मात्र स्थिर आहेत.

- Advertisement -

फळांचे दर

  • सफरचंद- 160-180 रुपये (प्रति किलो)3
  • मोसंबी-120 (प्रति किलो)
  • केळी – 50-60 रुपये ( प्रति डझन)
  • नासपती- 200 रुपये (प्रति किलो)

गणेशभक्तांचा उत्साह शिगेला

वीकेण्डमुळे बाजारपेठेत गणेशमूर्ती, सजावटीचे साहित्य, विद्युत रोषणाईसाठी लाईटिंगच्या माळा, मखर अशा विविध वस्तू घेण्यासाठी बाजारपेठेत गणेशभक्तांची तोबा गर्दी झाली होती. मात्र, दुपारी अचानक आलेल्या दमदार पावसामुळे भाविकांची काहीशी धावपळ उडाली. अनेक नागरिक आपल्या लहानग्यांसह बाजारात आलेले होते. अनेकांनी वाहने शालिमार, रविवार कारंजा व गोदाकाठी लावून मेनरोड, दहीपूल, कानडे मारुती लेन या प्रमुख बाजारपेठा गाठल्या होत्या. त्यामुळे खरेदी केलेले साहित्य पावसापासून वाचवत सुरक्षित निवारा शोधण्यात नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. मात्र, सायंकाळी पावसाची उघडीप झाल्यानंतर बाजारपेठा पुन्हा एकदा गर्दीने फुलून गेल्या होत्या.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -