घरमहाराष्ट्रWeather Update : महाराष्ट्राच्या अवर्षणग्रस्त भागात चांगल्या पावसाची शक्यता; स्कायमेटचा अंदाज काय...

Weather Update : महाराष्ट्राच्या अवर्षणग्रस्त भागात चांगल्या पावसाची शक्यता; स्कायमेटचा अंदाज काय म्हणतो…

Subscribe

स्कायमेट संस्थेने यंदाचा मान्सूनचा अंदाज जाहीर केला आहे. यंदा मान्सूनमध्ये चांगला आणि सरासरीप्रमाणे सामान्य पाऊस होण्याचा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मुंबई: राज्यात सध्या उष्णतेत प्रचंड वाढ झाली आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, काही भागांत अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अशातच आता यंदाच्या मान्सूनची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. स्कायमेट संस्थेने यंदाचा मान्सूनचा अंदाज जाहीर केला आहे. यंदा मान्सूनमध्ये चांगला आणि सरासरीप्रमाणे सामान्य पाऊस होण्याचा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. (Weather Update Chance of good rain in drought prone areas of Maharashtra What Skymet Forecast Says)

गेल्या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला होता, त्यामुळे अनेक भागात सध्या पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मात्र, यंदाच्या मान्सूनमध्ये यापासून दिलासा मिळणार आहे. कारण स्कायमेट वेदर या हवामानाचा अंदाज देणाऱ्या संस्थेच्या अहवालानुसार, यंदा समाधानकारक मान्सून पाहायला मिळेल. यंदा पावसाळ्यात पर्जन्यमान चांगलं राहणार असून सरासरीच्या 102 टक्के म्हणजेच सर्वसाधारण पाऊस पडेल, असा अंदाज स्कायमेट वेदरने वर्तवला आहे.

- Advertisement -

जगभरातील हवामानावर परिणाम करणारा एल निनो कमजोर होऊ लागला आहे. एल निनोचं ला निनोमध्ये रुपांतर होत असल्याने महाराष्ट्राच्या अवर्षणग्रस्त भागातही अर्थात जिथे पाऊस खूप कमी पडतो भागात चांगल्या पावसाचा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. जून ते ऑगस्ट या कालावधीत ला निना परिस्थिती असणार आहे. जून महिन्यापर्यंत अल निनोचं ला निनामध्ये रूपांतर होईल. यामुळे मान्सून वेळेवर दाखल होऊन चांगला होईल. विषुववृत्तीय प्रशांत महासागरात उच्च तापमान कायम राहिल्यास तीव्र चक्रीवादळे आणि अतिवृष्टी देखील होण्याची शक्यता आहे. एल निनोची स्थिती संपल्यानंतरही जागतिक तापमानातील विसंगती कायम राहण्याचीही शक्यता आहे. असे असले तरी यंदाचा मान्सून गेल्या वर्षीपेक्षा चांगला असू शकतो, अशी शक्यता स्कायमेट वेदरकडून वर्तविण्यात आली आहे.

- Advertisement -

मान्सून सामान्य राहण्याचा अंदाज

स्कायमेट वेदरच्या अंदाजानुसार, 2024 मध्ये भारतात मान्सून सामान्य राहण्याचा अंदाज आहे. याआधी स्कायमेटने जारी केलेल्या पहिल्या अंदाजात 2024 मध्ये मान्सून सामान्य राहणार असल्याचे संकेत दिले होते आणि अद्यापही ते कायम आहेत. त्यामुळे आगामी मान्सूनमध्ये 102 टक्के सामान्य पर्जन्यमान असेल. इतकचं नाही तर यंदा मान्सून कालावधीच्या सरासरी 96-104 टक्के असण्याचा अंदाज आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -