आईस्क्रिम म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. मात्र, आपल्याला लहानपणापासून आईस्क्रिम खाऊ नये असं घरातल्या मोठ्या मंडळींकडून सांगितलं जातं. पण तुम्हाला माहित आहे का, आईस्क्रीम खाणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. आईस्क्रिममध्ये बरेच पोषक तत्त्व असतात. शिवाय याच्या सेवनाने तुमचे आरोग्य देखील उत्तम राहते.
आईस्क्रिम खाण्याचे फायदे
- वजन कमी होते
आईस्क्रिम खाल्ल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. व्हिटॅमिन बी-2 आणि बी-12 मेटाबॉलिझमला संतुलित ठेवतो आणि बी-12 वजन कमी करण्यास सहायक असतो.
- शरीरातील थकवा दूर होतो
शरीरातील थकवा दूर होण्यासाठी एक कप आईस्क्रीमचे सेवन करावे. यामुळे थकवा दूर होण्यास मदत होते. दुधामध्ये प्रोटीन आणि कॅल्शियमचे घटक असल्यामुळे थकवा येत नाही.
- हाडं मजबूत होतात
आईस्क्रीम दुधापासून बनवले जाते. तसेच दुधामध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम असते. त्यामुळे कॅल्शियमच्या सेवनामुळे हाडं मजबूत होतात. शरीरात उपस्थित 99 टक्के कॅल्शियम हे हाडांमध्येच असते. त्यामुळे दुधाचे आईस्क्रीम खाल्ल्यास हाडांचे आजार दूर होण्यास मदत होते.
- स्किनसाठी फायदेशीर
दुधापासून तयार करण्यात आलेल्या आईस्क्रीममध्ये प्रोटीनचा समावेश असतो. प्रोटीन हे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असते. प्रोटीनचे सेवन केल्याने स्नायू मजबूत होतात. शरीराला प्रोटीनची अत्यंत गरज असते. प्रोटीनमुळे हाड, स्नायू, रक्त आणि त्वचेसाठी फायदेशीर असते.
- रोगप्रतिरोधक क्षमता वाढते
आईस्क्रीममध्ये व्हिटॅमिन ए, बी–2 आणि बी–12 असते. व्हिटॅमिन-ए मुळे तुमची स्किन, हाडं आणि इम्यूनिटी सिस्टमच्या क्षमतेला वाढवतात.