घरमहाराष्ट्रAmit Shah : शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस फुटण्याचं अमित शहांनी सांगितलं कारण, म्हणाले...

Amit Shah : शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस फुटण्याचं अमित शहांनी सांगितलं कारण, म्हणाले…

Subscribe

उद्धव ठाकरेंच्या पुत्र मोहामुळे शिवसेना फुटली तर शरद पवारांच्या पुत्रीमोहामुळे राष्ट्रवादी फुटली असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला.

भंडारा : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस भाजपाने फोडली असा आरोप वारंवार विरोधकांकडून केला जातो. मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही फोडली नाही, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे. उद्धव ठाकरेंच्या पुत्र मोहामुळे शिवसेना फुटली तर शरद पवारांच्या पुत्रीमोहामुळे राष्ट्रवादी फुटली असा आरोपही त्यांनी केला आहे. भंडाऱ्यातील साकोली येथे सुनील मेढेंच्या प्रचार सभेवेळी ते बोलत होते. (Lok Sabha Election 2024 Amit Shah said the reason for the split between Shiv Sena and NCP)

अमित शहा म्हणाले की, उद्धव ठाकरे भाजपावर आरोप करत आहेत. भाजपवाल्यांनी माझा पक्ष फोडला. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार म्हणतात माझा पक्ष फोडला. त्यामुळे आज मी महाराष्ट्राच्या जनतेला एक स्पष्ट करायला आलो आहे की, आम्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडली नाही. उद्धव ठाकरे यांच्या पुत्रप्रेमाच्या मोहाने शिवसेना फोडली. शरद पवार यांच्यादेखील पुत्रीमोहामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला, असा हल्लाबोल अमित शहा यांनी केला.

- Advertisement -

हेही वाचा – Amit Shah : भाजपा आरक्षण हटवणार नाही; अमित शहांनी विरोधकांना सुनावले

काँग्रेसने दहा वर्षात महाराष्ट्राला काय दिले? असा सवाल अमित शहा म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 10 वर्ष काँग्रेसने खोदलेला खड्डा बुजवण्यातच गेली आहेत. परंतु आता पुढच्या पाच वर्षात महान भारत बनवण्याचं काम होणार आहे. मोदींनी देशाच्या समोर एक संकल्प ठेवला आहे. 2047 मध्ये महान भारताची रचना करण्यात येणार आहे. भाजपा सरकार सत्तेत आल्यानंतर संपूर्ण देशात समान नागरीक कायदा लागू करणार आहे. तसेच संपूर्ण देशात विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेतल्या जातील. प्रत्येक वृद्ध जो 70 वर्षांपेक्षा जास्त वयाचा आहे, त्याचा 5 लाखांपर्यंतचा खर्च मोदी सरकार उचलणार आहे, असे जाहीरनाम्यात असल्याचेही अमित शाह यांनी यावेळी सांगितले.

- Advertisement -

भाजपा आरक्षण हटवणार नाही (BJP will not remove reservation)

दरम्यान, राहुल गांधींवर निशाणा साधताना अमित शहा म्हणाले की, काँग्रेस खोटं बोलत आहे की, भाजपला 400 पार एवढा बहुमत मिळालं, तर ते आरक्षण संपवून टाकतील. पण राहुल गांधी आम्हाला दोन वेळेला पूर्ण बहुमत मिळाले आहे. मात्र, कधीही आम्ही आमच्या बहुमताचा वापर आरक्षण हटवण्यासाठी केलेला नाही. उलट आम्ही बहुमताचा वापर कलम 370 हटवण्यासाठी आणि ट्रिपल तलाक हटवण्यासाठी केला आहे. त्यामुळे आज मी भंडारामध्ये आश्वासन देतो की, जोवर भाजपा राजकारणामध्ये आहे, तोवर आम्ही आरक्षण हटवणार नाही आणि कुणालाही हटवू देखील देणार नाही, असा इशारा अमित शहा यांनी दिला आहे.

हेही वाचा – Lok Sabha : काँग्रेसने 60 वर्षांत ओबीसींसाठी काय केलं? राहुल गांधींच्या टीकेवर फडणवीसांचा सवाल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -