घरपालघरआईस्क्रीमला लागतोय महागाईचा चटका

आईस्क्रीमला लागतोय महागाईचा चटका

Subscribe

आइस्क्रीम एक कपची सुरूवात १० किंवा २५ रुपयांपासून सुरू होते. त्यात कोन, स्टीक आणि फॅमिली पॅकही छोट्या आकारात उपलब्ध आहे.

जव्हार:  जव्हार शहरात वातावरणातील वाढलेल्या उष्णेतेमुळे लहान बालकांपासून ते अबाल वृद्धांना तीव्र उन्हाचे चटके चांगलेच जाणवत आहेत. उन्हापासून चैन पडावी म्हणून नाना प्रकारे उपाय केले जात आहेत. या सगळ्यांत आईस्क्रीमला अधिक पसंती मिळत आहे. मात्र सर्वत्र महागाईने नागरिकांचे कंबरडे मोडून टाकले असल्याने त्याचा फटका हा आईस्क्रीम दरास पडल्याने आईसक्रीम ला महागाईच्या झळा लागल्या आहेत. उन्हाळ्यात शरीराला गारवा मिळावा म्हणून आईस्क्रीम जणू अनेकांसाठी तृप्तीचा सागरच. मात्र, दुधाच्या दरासह कच्च्या मालाच्या दरात कमालीची वाढ झालेली आहे, त्यामुळे यंदा उन्हाळ्यात पण वाढत्या महागाईची झळ आता कुल्फी आणि आइस्क्रीमलाही बसली आहे. दरात १५ ते २० टक्के वाढ झाली आहे. असे असले तरी वाढते ऊन पाहता विक्रीत २० टक्के वाढ होण्याची शक्यता असल्याचे व्यापारी बोलत आहेत.
    सध्या बाजारात फॅमिली पॅकची किंमत १९० रुपयांवरून २२० रुपयांवर गेलेली आहे. उष्णतेत वाढ झाल्याने आईस्क्रीम पार्लरमध्ये ग्राहकांची गर्दीसुद्धा वाढू लागली आहे. विविध प्रकारे चव असलेल्या आईस्क्रीमची श्रेणी बाजारात उपलब्ध आहे. प्रत्येक वयोगटातील ग्राहकांना आकर्षित करत आहे. सध्या अनेक नवीन फ्लेवर्स बाजारात आले आहेत, पण केशर पिस्ता आणि बटर स्कॉच आणि सोबतीला कुल्फी सदाबहार आहेत. त्यापाठोपाठ ब्लॅक फॉरेस्ट, चॉकलेट, स्ट्रॉबेरी, व्हॅनिला, राजभोग, रजवाडी या फ्लेवर्सलाही पसंती असते. मात्र दूध आणि इतर गोष्टी महागल्याने आइस्क्रीमच्या किमतीत दरवाढ झाली आहे. बाजारातील प्रसिद्ध ब्रॅण्ड कंपन्यांचे आईस्क्रीमही बाजारात आहेत. आइस्क्रीम कप, कोन,स्टीक आणि फॅमिली पॅकमध्ये वेगवेगळे फ्लेवर उपलब्ध आहे. ग्राहक याची निवड आपल्या चवीनुसार करतात. सर्व प्रकारच्या चवीची आइस्क्रीम सर्वांना सहजरित्या उपलब्ध व्हावे, यासाठी सर्व ब्रॅण्डने याचे छोटे पॅकही आणले आहे. आइस्क्रीम एक कपची सुरूवात १० किंवा २५ रुपयांपासून सुरू होते. त्यात कोन, स्टीक आणि फॅमिली पॅकही छोट्या आकारात उपलब्ध आहे.
   फ्रोझन डेझर्ट आणि दुधाच्या साहाय्याने तयार केलेले आईस्क्रीम बाजारात आहेत. ग्राहकांमध्ये जनजागृती वाढू लागल्याने दुधाची आईस्क्रीमला मागणी वाढलेली आहे. कच्चा मालाच्या दरात वाढ झाल्याने यंदा १५ ते २० टक्के आईस्क्रीमच्या दरात वाढ झालेली आहे.
    -जूबेर अत्तार, आईस्क्रीम विक्रेता
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -