Saturday, May 4, 2024
घरमानिनीHealthवर्कआऊटनंतर तुम्ही देखील 'या' चुका करता?

वर्कआऊटनंतर तुम्ही देखील ‘या’ चुका करता?

Subscribe

नियमित वर्कआऊट करणं जितकं महत्वाचं आहे तितकेच वर्कआऊट केल्यानंतरचे काही नियम पाळणं देखील महत्वाचं आहे. एक्सपार्ट्सच्या मते, केवळ व्यायामाने तुम्ही तंदुरुस्त होता असं नाही. वर्कआऊटनंतर कधीच काही चुका करू नये. नाहीतर वर्कआऊट केल्याचा शरीरावर काहीच परिणाम दिसून येत नाही.

वर्कआऊटनंतर करु नये ‘या’ गोष्टी

Testosterone Boosting Exercises – TestoPrime USA

- Advertisement -

 

  • मध्येच व्यायाम बंद करणे

वर्कआऊट करताना शरीराच्या तापमानासोबतच रक्त संचार आणि हृदयाचे ठोके वाढतात. हे सामान्य होण्यासाठी थोडा वेळा लागतो. असे असताना वर्कआऊट करताना मध्येच व्यायाम करणं सोडू नका. हळूहळू व्यायाम करत सामान्य स्थितीमध्ये या. व्यायामानंतर हळूहळू जॉगिंग करून शरिराला सामान्य स्थितीत आणा.

- Advertisement -
  • स्ट्रेच न करणे

वर्कआऊटनंतर स्ट्रेच केल्याने दुसर्‍या दिवशी मांसपेशींमध्ये कोणतीच समस्या येत नाही. पुढच्या दिवशी तुम्हाला कोणतीच अडचण येणार नाही. जे लोक व्यायामानंतर स्ट्रेच करत नाहीत त्यांना अडचणी येऊ शकतात.

  • व्यायामानंतर न खाणे

वर्कआऊट नंतर काही तरी खा, असे केल्याने पेशींमध्ये सुधारणा होते. यामुळे व्यायामानंतर प्रोटीनयुक्त स्नॅक्स नक्की खा. दही, ब्लूबेरी किंवा मूठभर ड्रायफ्रुट्स खा.

The Best Gym Workout Plan For Gaining Muscle | PureGym

  • कपडे न बदलणे

व्यायाम करताना घामामुळे कपडे ओले होतात, जर व्यायामानंतर ते लवकर काढले नाहीत तर संक्रमण होऊ शकते. यामुळे व्यायामानंतर लवकर कपडे बदला.

  • शॉवर न घेणे

वर्कआऊटनंतर शॉवर न घेणे किंवा आंघोळ न करणे ही देखील एक समस्या बनू शकते. कारण व्यायामानंतर घाम वाळतो आणि यामुळे जीवाणू वाढतात, यामुळे शॉवर घेणं आवश्यक आहे.

  • अल्कोहोल सेवन करणे

वर्कआऊट नंतर लगेच अल्कोहोल प्यायल्याने शरीर डीहायड्रेट होऊ शकते. यामुळे वर्कआऊटनंतर खूप पाणी प्या.

  • कमी झोपणे

व्यायामासाठी भरपूर झोप आवश्यक असते. जर तुम्ही व्यायाम करत आहात तर कमीत-कमी 7-9 तास झोप घ्या. झोपल्यानंतर मांसपेश्याना मजबुती मिळते. झोपल्यामुळे तणावापासून दूर राहाता येते.

 


हेही वाचा :

विसराळूपणा वाढत चाललाय? मग दररोज खा ‘हे’ पदार्थ

- Advertisment -

Manini