घरक्राइमSharad Mohol Dead: गुंड शरद मोहोळच्या पत्नीची फडणवीसांकडे धाव; न्याय मिळवून देण्याची...

Sharad Mohol Dead: गुंड शरद मोहोळच्या पत्नीची फडणवीसांकडे धाव; न्याय मिळवून देण्याची केली मागणी

Subscribe

पुणे कोथरुडमधील कुख्यात गॅंगस्टर शरद मोहोळ याची त्याचा साथीदार साहिल उर्फ मुन्ना पोळेकरने गोळ्या झाडून हत्या केली होती. त्याच्या हत्येनंतर पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली आहे. या हत्येमागील कारणही पोलिसांनी माध्यमांपुढे येत सांगितलं आहे.

पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या हत्येनंतर पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली आहे. या कारवाईनंतर शरद मोहोळ याच्या पत्नीने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धाव घेत आपल्याला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली आहे. (Sharad Mohol Dead Gangster Sharad Mohols wife runs to Fadnavis Demanded for justice)

पुणे कोथरुडमधील कुख्यात गॅंगस्टर शरद मोहोळ याची त्याचा साथीदार साहिल उर्फ मुन्ना पोळेकरने गोळ्या झाडून हत्या केली होती. त्याच्या हत्येनंतर पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली आहे. या हत्येमागील कारणही पोलिसांनी माध्यमांपुढे येत सांगितलं आहे. याच दरम्यान गुंड शरद मोहोळ हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. ती म्हणजे शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत आपल्याला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस कोणती कारवाई करतात हे पहावे लागणार आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : Raj Thackeray : जातीपातीत महाराष्ट्राला अडकविण्याचा डाव; राज ठाकरेंचा निशाणा कोणावर?

गुंड शरद मोहोळची पत्नी भाजपा पदाधिकारी!

पुण्यातील कोथरूडमधील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून, त्याची पत्नी स्वाती मोहोळ या मात्र, राजकारणात सक्रीय आहेत. काही महिन्यांपूर्वीच स्वाती मोहोळ यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्या पुणे शहर भाजप महिला आघाडीच्या पदाधिकारी आहेत. हे विशेष.
शरद मोहोळ हत्या प्रकरणाबाबत माहिती देताना पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, या प्रकरणी एका वाहनातून 8 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 3 पिस्तूल, 3 मॅगझिन जप्त करण्यात आले. पोलीस आरोपीची चौकशी करण्यात व्यस्त आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : Jarange Vs Ajit Pawar : ‘तुम्ही आधीपासूनच मराठ्यांच्या मुळावर उठले; अजितदादांच्या इशाऱ्याला जरांगेंचं उत्तर

यामुळे संपवला गुंड शरद मोहोळ

शरद मोहोळ याच्यावर तीन आरोपींनी गोळ्या झाडल्या. मुख्य आरोपी साहील उर्फ मुन्ना पोळेकर आणि इतर दोन जणांनी रस्त्यावर गोळीबार केला. मुन्ना पोळेकर हा शरद मोहोळ याच्याबरोबर फिरायचा. आरोपी साहिल याचा मामा नामदेव महिपती कानगुडे आणि दुसरा एक नातेवाईक विठ्ठल किसन गांडले या दोघांचे शरद मोहोळसोबत वैमनस्य होते. यातूनच ही हत्या झाल्याची माहिती पुढे येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -