Thursday, April 11, 2024
घरमानिनीHealthStomach Gas Relief : ॲसिडिटी आणि गॅसच्या समस्येवर घरगुती उपाय

Stomach Gas Relief : ॲसिडिटी आणि गॅसच्या समस्येवर घरगुती उपाय

Subscribe

धावत्या जीवनशैलीमुळे आपल्या दैनंदिन जीवनातला पोषक आहार कमी होत चालला आहे. अनेकदा कामांच्या धावपळीत आपण योग्य आहार घेण्यासाठी वेळ देत नाही आणि बाहेरचं अनहेल्दी फूड (Unhealthy Food) खातो. या अन्नाचं आपल्या शरीरात लवकर पचन होत नाही. त्यामुळे आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. सतत बसून काम करणे, व्यायाम न करणे आणि दिवसभरात चहाचे अधिक प्रमाणात सेवन करण्याने पोटात अधिक गॅस निर्माण होते. तसंच यावर अनेकदा औषधं घेतली जातात. पण गॅसच्या या समस्येवर घरगुती उपाय अधिक परिणामकारक ठरतात हे तुम्हाला माहीत आहे का? जाणून घेऊयात.

जिऱ्याचे पाणी
गॅस्ट्रिक अथवा गॅसची समस्या असेल तर जिऱ्याचे पाणी सर्वाधिक चांगला घरगुती उपाय आहे. जिऱ्यामधील तेल हे लाळ ग्रंथी उत्तेजित करण्याचे काम करते. यामुळे जेवण चांगले पचायला मदत मिळते. पोटातील अतिरिक्त गॅस निर्माण होण्यास रोखते. जिऱ्याचे पाणी बनविण्यासाठी बनविण्यासाठी १ चमचा जिरे एक कप पाण्यात उकळवा. थंड झाल्यावर प्या.

- Advertisement -

अ‍ॅप्पल साईडर व्हिनेगर
अ‍ॅप्पल साईडर व्हिनेगरचे सेवन केल्याने पोटातील गॅसच्या समस्येतून सुटका होते. त्यासाठी १ कप पाणी आणि २ मोठे चमचे अनफिल्टर्ड अ‍ॅप्पल साईड व्हिनेगर मिक्स करावे. याचे दिवसातून २ वेळा सेवन करावे. मात्र याचा वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. स्वतःच्या मनाने याचा वापर करू नये.

ओवा
तुम्हाला पोटात गॅसची समस्या निर्माण झाली असेल तर भाजलेला ओवा खावा. ओव्याचे सेवन केल्याने गॅसपासून लवकर सुटका मिळते. अनादी काळापासून चालत आलेला हा उपाय आहे. ओव्यामध्ये थायमॉल नावाचे यौगिक आहे, जे गॅस्ट्रिक रसाचा स्राव करते आणि पचनक्रियेसाठी मदत करते. गॅसची समस्या असेल तर अर्धा चमचा ओवा खावा.

- Advertisement -

कोमट पाणी पिणे
रात्री झोपताना एक ग्लास कोमट पाणी प्यायल्याने पोट फुगण्याची समस्या दूर होते. तसेच दिवसभरात मुबलक पाणी प्यायल्याने आम्लपित्त , जळजळ होणं कमी होतं.

हिरव्या पालेभाज्या
पोट साफ न होण्यामुळे त्वचेवर पुरळ येणं, त्यातबरोबर अॅलर्जीचा त्रास वारंवार होतो. हिरव्या पालेभाज्यांमध्या पाण्याची मात्रा मोठ्या प्रमाणात असते. आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश केल्यास अपचनाचा त्रास कमी होतो. त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. त्याचबरोबर त्वचेवरील अॅलर्जीचा त्रास होतो, आणि त्वचेचं आरोग्य सुधारण्यास मदत होते.

- Advertisment -

Manini