घरताज्या घडामोडीSangli Lok Sabha : वरिष्ठांच्या निर्णयानंतरही काँग्रेस सांगलीचा तिढा कायम; विशाल पाटलांसाठी...

Sangli Lok Sabha : वरिष्ठांच्या निर्णयानंतरही काँग्रेस सांगलीचा तिढा कायम; विशाल पाटलांसाठी ही कमिटी बरखास्त?

Subscribe

Lok Sabha Election 2024 सांगलीची जागा काँग्रेसला न मिळाल्याने आमदार विश्वजीत कदम यांनी दिल्लीत पक्षश्रेष्ठींची भेट घेतली होती. शिवाय महाविकास आघाडीला सांगलीच्या जागेबाबत फेरविचार करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, मुंबईत झालेल्या महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेदरम्यान सांगलीचा जागा शिवसेनेला आणि भिवंडीची जागा राष्ट्रवादीला निश्चित करण्यात आली. त्यामुळे विश्वजीत कदमांची दिल्लीवारी फेल गेली. परिणामी आता काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले असून, मिरज तालुका काँग्रेस कमिटी बरखास्त करण्याचा ठराव काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे.

Sangli Lok Sabha सांगली : लोकसभा निवडणूक 2024च्या (Lok Sabha Election 2024) पहिल्या टप्प्याचील मतदान प्रक्रियेला केवळ सहा दिवस शिल्लक राहिले आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदानप्रक्रिया 19 एप्रिल रोजी पार पडणार असून, विदर्भात सर्वच पक्षश्रेष्टींच्या सभा होत आहेत. एकिकडे प्रचारसभा सुरू असताना दुसरीकडे महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही तर, महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला. मात्र, या फॉर्म्युलावर मविआतील काँग्रेस पक्ष नाराज असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण राज्यातील सांगली आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला मिळावा, अशी मागणी करण्यात आली होती. परंतू, सांगली शिवसेनेच्या (ठाकरे गट) आणि भिवंड राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) वाट्याला गेल्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते नाराज झाले आहेत. विशेष म्हणजे सांगली लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी थेट मिरज तालुका काँग्रेस कमिटी आजपासून बरखास्त करण्याचा ठराव केला. (Sangli Lok Sabha Resolution to dissolve Miraj Taluka Congress Committee from today)

मिळालेल्या माहितीनुसार, सांगलीची जागा काँग्रेसला न मिळाल्याने आमदार विश्वजीत कदम यांनी दिल्लीत पक्षश्रेष्ठींची भेट घेतली होती. शिवाय महाविकास आघाडीला सांगलीच्या जागेबाबत फेरविचार करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, मुंबईत झालेल्या महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेदरम्यान सांगलीचा जागा शिवसेनेला आणि भिवंडीची जागा राष्ट्रवादीला निश्चित करण्यात आली. त्यामुळे विश्वजीत कदमांची दिल्लीवारी फेल गेली. परिणामी आता काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले असून, मिरज तालुका काँग्रेस कमिटी बरखास्त करण्याचा ठराव काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे. सांगलीमधील विशाल पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात पार पडलेल्या मिरज तालुक्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्याच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha 2024: मुंबईतील सहापैकी एकतरी जागा जिंकून दाखवा; राऊतांचं भाजपाला ओपन चॅलेंज

सांगली लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे नाराज विशाल पाटील वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, सांगली लोकसभेच्या रिंगणात नव्याने स्थापन झालेली ओबीसी बहुजन पार्टी सुद्धा रिंगणात असून प्रकाश शेंडगे स्वत: रिंगणात आहेत. त्यामुळे कोण कोणाच्या किती मतांवर डल्ला मारणार? यामध्येही खेळ रंगणार आहे. Lok Sabha Election 2024

- Advertisement -

विशेष म्हणजे सांगली लोकसभेसाठी स्वाभिमानी पक्षाकडून जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांना उमेदवारी देण्यात आल्याची घोषणा माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. सांगली लोकसभेसाठी विद्यमान उमेदवार हे साखर सम्राट आहेत. त्यांनी शेतकऱ्यांना लुबाडले आहे, अशा साखरसम्राटांना आणखी लुटण्यासाठी ताकद देऊ नये, यासाठी महेश खराडे आम्ही रस्त्यावर लढणारा उमेदवार दिला असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. Lok Sabha Election 2024


हेही वाचा – Lok Sabha 2024 : लोकसभेच्या रणधुमाळीत भाजपला मोठा धक्का; धैर्यशील महिते-पाटलांचा राजीनामा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -