Tuesday, April 30, 2024
घरमानिनीHealthघामोळे येऊ नये यासाठी फॉलो करा काही सोप्या टिप्स

घामोळे येऊ नये यासाठी फॉलो करा काही सोप्या टिप्स

Subscribe

उन्हाळ्याच्या दिवसातही आपल्या आरोग्यासोबत त्वचेची देखील काळजी घेतली जाते. उन्हाचा त्रास प्रत्येक व्यक्तीला कमी जास्त प्रमाणात होत असतो. लहान असो किंवा मोठे अगदी लहान बाळालाही उष्णतेमुळे बहुतेकदा उन्हाळ्यात पुरळ येतात. तसेच अति उष्ण आणि दमट वातावरणात राहाणाऱ्या लोकांना घामोळ्यांचा त्रास अधिक जाणवतो. त्यामुळे घामोळे न येण्यासाठी कोणती काळजी घ्यावी, हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

घामोळे येऊ नये यासाठी करा हे उपाय

Heat Rash: How Does It Occur and What You can Do - HealthKart

- Advertisement -

 

  • घामोळ्या सर्वसाधारणपणे मानेवर तोंडावर, पाठीवर, छातीवर, खांद्यावर, कपाळावर आलेल्या दिसून येतात.
  • मुलतानी माती आणि गुलाब पाणी एकत्र करुन घामोळे आलेल्या जागेवर लावा सुकल्यानंतर धुवून टाका. हे मिश्रण आठवड्यातून चार वेळा लावा. पुदिना, मुलतानी माती आणि थंड दूध याची पेस्ट करुनही ती लावल्याने घामोळ्यांचा त्रास कमी होतो.
  • कडूलिंबाच्या पानांची पेस्ट बनवून लावल्याने घामोळयांची समस्या दूर होते. तसेच सकाळी अंघोळीच्या पाण्यात कडूलिंबाची पानं उकळवून त्याने अंघोळ केल्यानेही फायदा होतो. कडूलिंबाच्या पानांनी त्वचेचे इन्फेक्शन दूर होण्यास मदत होते.
  • थंड वातावरणात राहाण्याचा प्रयत्न करावा किंवा वातानुकुलित वातावरणात रहावे. घामोळ्यांमुळे येणारी खाज कमी करण्यासाठी दिवसातून 2-3 वेळा गार पाण्याने अंघोळ करावी.
  • उन्हाळ्यात सैलसर, सुती कपडे परिधान करावे आणि कृत्रिम धाग्याचे कपडे वापरु नयेत. जेणेकरुन हवा खेळती राहते. तसेच काळे, निळे असे भडक रंग वापरु नये.
  • या दिवसात भरपूर पाणी प्यावे जेणेकरून शरीरात पाण्याची कमतरता जाणवणार नाही. तसेच रसदार फळे खावीत.
  • घामोळ्यांवर कोणतेही क्रीम किंवा तेल लावू नये त्यामुळे छिद्रे बंद होतील आणि समस्या आणखी वाढते.

हेही वाचा :

Heatstroke- उन्हाळ्यात उष्माघातापासून असा करा बचाव

- Advertisment -

Manini