जर तुम्हाला म्हातारपणातही तंदुरुस्त राहायचे असेल आणि आजारांना बळी पडायचे नसेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फिटनेसकडे लक्ष अधिक देणे महत्वाचं आहे. निरोगी लाईफस्टाईल आणि खाण्याच्या सवयींकडे लक्ष देऊन तुम्ही प्रत्येक वयात निरोगी राहू शकता. यासोबतच म्हातारपणात अनेक आजार हे माणसांना होत असतात. यासाठी योग्य वेळी योग्य ती काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.
यासोबतच म्हातारपणात अनेक आजार हे माणसांना होत असतात. यासाठी योग्य वेळी योग्य ती काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच कालांतराने फिटनेसकडे लक्ष देणे जमत नाही यासाठी आता पासून जर का तुम्ही आरोग्याची विशेष अशी काळजी घेतली तर शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तुम्ही म्हातारपणात नक्कीच फिट राहाल. चला तर जाणून घेऊया अशाच काही फिटनेस टिप्स ज्या केवळ फक्त म्हातारपणात उपयोगी नाही तर प्रत्येक वयात उपयोगी पडतील.
-रोजच्या रोज स्ट्रेंथ ट्रेनिंग रूटीन फॉलो करा.
– धावणे, जॉगिंग किंवा वेगवान चालणे शक्य आहे, परंतु धावणे सर्वोत्तम आहे.
– सकाळी उठल्यानंतर दिवसाची सुरुवात कोमट पाण्याने करा, यामुळे शरीर उबदार आणि चांगले राहते.
– नाश्त्यात प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करा. यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि रक्तातील साखरही नियंत्रणात राहते.
– जर तुम्ही कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ खात असाल तर त्यात ऑलिव्ह ऑईल टाका.
– दिवसभरात कोणतेही आवडतील अशी फळ खा.
– ग्रीन टी प्यायल्याने हृदयाशी संबंधित आजारांचा धोका 25 टक्क्यांनी कमी होतो.
– त्यामुळे दुधाचा चहा कमी करा आणि एक कप ग्रीन टी प्यायला सुरुवात करा.
– पायऱ्या चढणे हा खूप चांगला व्यायाम आहे, यामुळे कार्डिओ फिटनेस वाढू शकतो.
– दररोज फक्त 1 मिनिट स्कॉटस केल्याने शरीरातील रक्तप्रवाह सुधारला जाऊ शकतो.
– फिटनेस चांगला राहण्यासाठी फक्त व्यायामच नाही तर झोपही खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे रोज ८ तासांची झोप घ्या.
– चाळीशी ओलांडताच तुमच्या आहारातील पोषणाचे प्रमाण वाढवा.
– जर तुम्ही काम करत असाल तर ऑफिसमध्ये बसण्याची पद्धत, मध्ये ब्रेक घेणे, पाणी पिणे इत्यादी गोष्टी लक्षात ठेवा.
________________________________________________________________________