Saturday, April 27, 2024
घरमानिनीRelationshipकरियर आणि लव्हलाईफ असं करा बॅलन्स

करियर आणि लव्हलाईफ असं करा बॅलन्स

Subscribe

आपल्यापैकी बरेच लोक असतात जे करिअरच्या बाबतीत जरा जास्तच सिरीअस असतात. अनेकदा या करिअर ओरिएंडट लोकांचा कामामुळे कुटुंबाकडे किंवा जोडीदाराकडे दुर्लक्ष होतं. त्यामुळे सहाजिकच या कारणामुळे घरात वादविवाद होऊ लागतात. परंतु, जॉब, करिअर जितकं महत्त्वाचं आहे तितकच आपलं कुटुंबदेखील गरजेचं आहे. त्यामुळे धकाधकीच्या या जीवनात दोन्ही गोष्टींचा समतोल राखणं अत्यंत गरजेचं आहे. परिस्थिती आपल्या नातेसंबंधावर तसेच करिअरवरही परिणाम करू लागते. तुम्हाला ना तुमचे व्यावसायिक जीवन सोडायचे असते, ना तुमच्या वैयक्तिक जीवनावर त्याचा परिणाम होऊ द्यायचा असतो. म्हणूनच या दोन्ही गोष्टी एकत्र सांभाळायला शिकलेले बरे. म्हणूनच, करिअर आणि रिलेशनशीप या दोघांमधील समतोल कसा राखावा ते पाहुयात.

नात्यातील दोन्ही लोक काम करत असतात तेव्हा ही परिस्थिती अधिक सामान्य असते. तुम्ही एकमेकांना वेळ देऊ शकत नाही आणि व्यस्त जीवनामुळे नात्यात अंतर येऊ लागते. व्यस्त दिनचर्या, मोठी उद्दिष्टे, असंख्य प्रकल्प आणि बरेच काही, जेणेकरुन तुमची कारकीर्द भरभराट होत असताना तुमचे लव्हलाईफ धोक्यात येऊ नये, यामध्ये संतुलन राखण्याचा एकमेव मार्ग आहे. येथे आम्ही काही टिप्स सांगत आहोत, ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या करिअरमध्ये संतुलन निर्माण करू शकता आणि जीवनात प्रेमाच्या नात्यालाही सांभाळू शकता.

- Advertisement -

नात्याला वेळ द्या
एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी डेट नाईटवर जाणे किंवा सुट्टीचे नियोजन करणे आवश्यक नाही. छोट्या-छोट्या गोष्टींमध्येही तुम्ही एकमेकांसोबत वेळ घालवू शकता. एकत्र स्वयंपाक करा, एकत्र घर स्वच्छ करा, एकत्र टीव्ही पाहा, अशाप्रकारे तुम्ही एकमेकांना वेळ देऊ शकता. या छोट्या-छोट्या गोष्टी अनावश्यक वाटू शकतात. परंतु जेव्हा तुमची वेळ कमी असते, तेव्हा तुमच्या जोडीदाराशी संपर्क साधण्यासाठी त्या सर्वोत्तम असतात.

अपेक्षा ठेऊ नका
अनेकदा रिलेशनशीपमध्ये पार्टनरच्या एकमेकांकडून काही अपेक्षा असतात. मात्र, या अपेक्षा पूर्ण झाल्याच पाहिजेत असा अट्टाहास करु नका. कामाचा ताण, जबाबदारीचं ओझं यामुळे अनेकदा मानसिक व शारीरिक ताण येत असतो. त्यामुळे अशावेळी पार्टनरकडून कोणत्याही अमूक-तमूक प्रकारच्या अपेक्षा ठेऊ नका. अनेकदा घरातील सगळं काम स्त्रियांनीच पूर्ण करावं अशी सर्वसामान्यपणे कुटुंबियांची अपेक्षा असते. मात्र, स्त्रियांवरील कामाचा भार वाढला तर त्यात तुम्ही तिची नक्कीच मदत करु शकता.

- Advertisement -

निर्णय घेताना पार्टनरचा सल्ला घ्या
बऱ्याचदा काही जण पार्टनरला कल्पना न देता एखादा निर्णय घेतात. मात्र, यामुळे पार्टनर दुखावला जाऊ शकतो. ज्यामुळे मतभेद निर्माण होऊन नात्यात दुरावा येऊ शकतो. म्हणूनच, कोणताही निर्णय घेताना पार्टनरचा सल्ला नक्की घ्या.

तुमची आवड फॉलो करा
तुमच्या नात्यात समतोल नाही असे तुम्हाला वाटत असेल तर अनेकदा वेळेअभावी असे होते. तुमच्याकडे खूप काम आहे आणि तुमचा पार्टनर नसेल किंवा तुमचा पार्टनर नवीन व्यवसायात असेल आणि तुमच्यासोबत घालवण्यासाठी जास्त वेळ काढू शकत नाही. अशावेळी तुम्ही आणि तुमचा जोडीदार तुमच्या आवडीचे अनुसरण करा. एकमेकांसोबत वेळ न घालवल्यामुळे चिडचिड करण्यापेक्षा आपल्या छंदाचा आनंद घेणे चांगले आहे. यामुळे तुम्ही स्वत:चा विकास करू शकाल आणि तुमचे नातेही सुधारेल.

परिस्थितीनुसार बदला 
ऑफिसचं आणि घरचं वातावरण पूर्णपणे वेगळं असतं. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी वेगळ्या पद्धतीनेच वागा. ऑफिसप्रमाणे घरात वागू नका. तसंच घराप्रमाणेच ऑफिसमध्येही स्वच्छंदीपणे वागू नका. त्यामुळे परिस्थितीनुसार कसं बदलावं याचं कौशल्य जाणून घ्या.

- Advertisment -

Manini