घरलाईफस्टाईलTravel safety : हॅप्पी जर्नी साठी फॉलो करा 'या' टीप्स...

Travel safety : हॅप्पी जर्नी साठी फॉलो करा ‘या’ टीप्स…

Subscribe

सगळ्यांना फिरायला जायला आवडत आणि फिरण्याचा प्लॅन आपण सर्वच जण महिनाभर आधीच करतो. कुठे जायचं,कसं जायचं आणि कधी जायचं हे आपले ठरलेले प्रश्न आहेत. जे आपल्या सर्वांनाच पडतात. अशावेळी आपण प्रत्येक एक एक गोष्टींचा विचार करत असतो. पण आपली हॅप्पी जर्नी कशी होईल याकडे आपण जरा कमी लक्ष देतो. म्हणजे ट्रॅव्हलिंग करत असताना आपल्याला कोणकोणत्या अडचणी येऊ शकतात. या कडे आपण बारकाईने बघत नाही. अशावेळी कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी याकडे सुद्धा जरा लक्ष द्यायला हवे.

अशातच जरा का तुम्ही जर तुम्ही कारने लांबच्या प्रवासासाठी निघत असाल, तर तुम्हाला सर्वप्रथम वाहनाच्या सर्व्हिसिंगकडे लक्ष देणे आवश्यक आहे. प्रवासादरम्यान गाडीचा बिघाड झाला तर तुमचा प्रवास कठीण होऊ शकतो. तसेच गाड्यांच्या सर्व्हिसिंग करून अनेक समस्या टाळता येतात. त्यामुळे पिकनिकला जाताना वाहनाची सर्व्हिसिंग करून घ्या. तसेच कार सर्व्हिसिंग दरम्यान गाड्यांच्या एअरबॅग्स एकदा तपासून घ्या.

- Advertisement -

19,500+ Family Driving Stock Photos, Pictures & Royalty-Free Images -  iStock | Family car, Family driving in car, Road trip

हॅप्पी जर्नी साठी या टिप्स फॉलो करा-

  • कारने लांबच्या प्रवासाला जाण्यापूर्वी, तुम्ही कारमध्ये टूल्स किट ठेवा.
  • यासह प्रवासादरम्यान गाडी अचानक पंक्चर झाली तर टूल्स किटचा वापर करून पंक्चर सहज दुरुस्त करू शकतो.
  • महत्वाचे म्हणजे लांब ठिकाणच्या प्रवासासाठी जाताना ड्रायव्हिंग स्किल्सचा योग्य उपयोग करा.
  • तसेच ज्या व्यक्तीला चांगली गाडी चालवता येते अशा व्यक्तींनाच गाडी चालवायला सांगा.
  • राज्य महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्गावर गाडी कशी चालवायची हे माहीत असेल तरच प्रवासाचा प्लॅन करा. नाहीतर योग्य ड्रायव्हर सोबत ठेवा. यामुळे तुमचा प्रवास सुलभ आणि सोयीस्कर होईल.
  • याशिवाय रात्री गाडी चालवायची असेल तर नाईट ड्राईव्हचे कौशल्य माहित असणेही खूप गरजेचे आहे.
  • याशिवाय, तुमच्याकडे स्वतःचे ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे.
  • लांबच्या प्रवासाला जाताना गाडीच्या बूट स्पेसमध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त सामान ठेवण्याकडे कल असल्याचे अनेकवेळा दिसून येते.
  • यामुळे तुमची गाडी ओव्हरलोडेड होते आणि जरा का काही अपघात झाला तर गाडीचे वजन जास्त असल्यामुळे गाडी पलटी होऊन पडू शकते.
  • तसेच बाहेर प्रवास करताना गाडीत वैद्यकीय किट ठेवा. जेणेकरून इमर्जन्सीसाठी याचा पटकन फायदा होतो.

हेही वाचा :

कार खरेदी करताना या गोष्टी माहीत असायला हव्यात

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -