घरदेश-विदेशTMC : महुआ मोईत्रांवर पक्ष कारवाई करण्याच्या तयारीत; लाच प्रकरणावर मागवले उत्तर

TMC : महुआ मोईत्रांवर पक्ष कारवाई करण्याच्या तयारीत; लाच प्रकरणावर मागवले उत्तर

Subscribe

पैसे घेऊन संसदेत प्रश्न विचारण्याच्या प्रकरणात तृणमूल क़ॉंग्रेसच्या खासदार मुहआ मोईत्रा यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत

नवी दिल्ली : मागील दोन ते दिवसांपासून चर्चेत असलेल्या तृणमूल कॉंग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर आता पक्ष कारवाई करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. कारण, संसदेत प्रश्न विचारण्यासाठी व्यावसायिकाकडून लाच स्वीकारल्याचा त्यांच्यावर आरोप असून, याप्रकरणावर तृणमूलकडून कोणताही बाजू पुढे आली नाही हे विशेष.(TMC Party ready to take action on Mahua Moitra Answer sought on bribery case)

पैसे घेऊन संसदेत प्रश्न विचारण्याच्या प्रकरणात तृणमूल क़ॉंग्रेसच्या खासदार मुहआ मोईत्रा यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. कारण, आता या प्रकरणांत तृणमूल कॉंग्रेस मोइत्रांवर कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. पक्षाने या प्रकरणात खासदार मोईत्रा यांना उत्तर मागवले आहे. टीएमसीचे वरिष्ठ नेते आणि खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी सांगितले की, खासदार महुआ मोईत्रा यांना याप्रकरणी सविस्तरपणे उत्तर मागवले आहे. सोबतच त्यांनी सांगितले की, त्यांच्यावर योग्य ती कारवाई करणार आहे. अशी माहिती पुढे येत आहे की, पक्षाच्या संसदीय आचार समितीच्या अहवालानंतरच पक्ष कारवाई करणार असल्याची माहिती पुढे येत आहे.

- Advertisement -

भाजपने केला टीएमसीवर हल्लाबोल

भारतीय जनता पार्टीने याप्रकरणी महुआ मोईत्रा यांच्यावर हल्ला चढवला आहे. बीजेपीने हे प्रकरण हाताशी घेत तृणमूल कॉंग्रेसला घेरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यांनी म्हटले की, खरं म्हणजे कोणत्या कारणांमुळे पक्ष याप्रकरणावर कुठलीच प्रतिक्रिया देत नाही. महुआ मोईत्रा या टीमएसीच्या खासदार असून, पक्षाने याप्रकरणी आपली भूमिका जाहीर करणे गरजेचे आहे. नाही तर पक्ष काही तरी लपवत आहे असे यातून दिसून येत असल्याचा आरोपसुद्धा भाजपाने केला आहे.

हेही वाचा : MARATHA RESERVATION : मंत्र्यांना गावबंदी; मनोज जरांगे पाटलांकडून पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा

- Advertisement -

काय आहे नेमकं प्रकरण?

तृणमूल कॉंग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी व्यावसायिक दर्शन हिरानंदानी यांच्याकडून दोन कोटी रुपये नगदी घेतल्याचा आरोप आहे. यामुळे भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून या प्रकरणाचा तपास करण्याची मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, महुआ मोईत्रा यांनी लाच स्वीकारून त्यांच्या संसदेची लॉगीन आयडीसुद्धा व्यावसायीकास दिली. मात्र, खासदार महुआ मोईत्रा यांनी या सगळ्या आरोपाना नाकारले.

हेही वाचा : Maratha Reservation : ‘मलमपट्टी नको, कायमचा उपचार पाहिजे; 24 तारखेनंतरचे आंदोलन सरकारला झेपणार नाही’

पक्षाने दिला होता बोलण्यास नकार

तृणमूल कॉंग्रेसच्या खासदार असलेल्या महुआ मोईत्रा यांच्या कथित लाच स्वीकारण्याच्या प्रकरणावर शनिवारी पक्षाने कुठलीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला होता. टीमसीच्या पश्चिम बंगालचे महासचिव आणि प्रवक्त कुणाल घोष हे म्हणाले होते की, पक्षाकडे याप्रकरणी बोलण्यास काहीच नाही. पक्षाला असे वाटते की, ज्या व्यक्तीभोवती हे प्रकरण फिरत आहे त्यांनीच या प्रकरणी उत्तर द्यावे जेणे करून ते योग्य राहील.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -