Monday, December 11, 2023
घरमानिनीKitchenRecipe : मुलांच्या टिफीनमध्ये द्या अंडा पराठा

Recipe : मुलांच्या टिफीनमध्ये द्या अंडा पराठा

Subscribe

नाश्तामध्ये अनेक विविध प्रकार असतात. मात्र, काही पदार्थांची तयारी ही आदल्या दिवसापासून करावी लागते. परंतु एखादा झटपट नाश्ता करायचा असल्यास अंडा पराठा ही बेस्ट अशी रेसिपी आहे.

साहित्य :

  • दोन अंडी
  • एक कांदा बारीक चिरलेला
  • कोथिंबीर बारीक चिरलेली
  • एक कप कणीक (गव्हाचे पीठ)
  • लाल तिखट
  • चवीनुसार मीठ
  • तेल आवश्यकतेनुसार

कृती :

Egg Paratha Recipe | Crispy Egg Paratha Recipe | Homemade Restaurant Style Flaky Layered Egg Paratha - YouTube

- Advertisement -
  • नेहमीप्रमाणे कणीक भिजवून घ्यावी. त्या कणकेचे गोळे करून त्याचे फुलके करुन घ्यावे.
  • आता एक फुलका पुन्हा तव्यावर टाकावा, थोडासा गरम झाला की उलटावा.
  • दुसरीकडे एका वाटीत अंडी फोडून त्यात कांदा, लाल तिखट, मीठ, कोथिंबीर घालून चांगलं फेटावं आणि ते मिश्रण त्या फुलक्याच्या गरम बाजूवर तेल लावल्यासारखं लावावे.
  • आता त्यावर दुसरा फुलका दाबून बसवावा.
  • अर्ध्या मिनीटाने फुलका हलक्या हाताने उलटलून त्याच्या बाजूने चमचाभर तेल सोडावं.
  • तयार गरमा-गरम अंडा पराठ्याचा आस्वाद घ्या.

हेही वाचा :

Pakoda : कुरकुरीत कोबी पकोडा

- Advertisment -

Manini