घरमहाराष्ट्रअजित पवारांकडून दाखल प्रतिज्ञापत्रात शरद पवारांना विरोधच नाही; सुनावणीनंतर माहिती उघड

अजित पवारांकडून दाखल प्रतिज्ञापत्रात शरद पवारांना विरोधच नाही; सुनावणीनंतर माहिती उघड

Subscribe

राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत केंद्रीय निवडणूक विभागात सुनावणी सुरु असून, सोमवारी झालेल्या सुनावणीत शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी जोरदार युक्तिवाद केल्याची माहिती आहे.

नवी दिल्ली : राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह कोणाचे याबाबत काका -पुतण्याची (अजित पवार- शरद पवार) लढाई केंद्रीय निवडणूक आयोगात सुरू असून, आज सोमवारी (20 नोव्हेंबर) झालेल्या सुनावणीनंतर शरद पवार गटाकडून अजित पवार गटाने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राबाबत मोठा खुलासा केला असून, यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघणार एवढे मात्र खरे. (There is no opposition to Sharad Pawar in the affidavit filed by Ajit Pawar Disclosure of information after hearing)

राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत केंद्रीय निवडणूक विभागात सुनावणी सुरु असून, सोमवारी झालेल्या सुनावणीत शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी जोरदार युक्तिवाद केल्याची माहिती आहे. तब्बल तीन तासांच्या सुनावणीनंतर माध्यमांशी संवाद साधताना वकील अभिषेक मनू सिंघवी म्हणाले की, अजित पवार गटाने निवडणूक विभागात प्रतिज्ञापत्र सादर करणाऱ्या व्यक्तीला आज सादर केले. कारण, या व्यक्तीला माहितीच नाही की त्यांच्या नावाचे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले आहे. तेव्हा जो अशी फसवणूक करतो, त्याला कोणत्याच पातळीवर सूट देणे चुकीचे आहे. जो व्यक्ती न्याय मागत आहे. त्याला योग्य वेळेत न्याय मिळणे गरजेचे असल्याचे सिंघवी यावेळी म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : ‘माझ्याकडे आणखी 27 फोटो- 5 व्हिडीओ’; संजय राऊतांचा बावनकुळेंवर पुन्हा हल्लाबोल

फौजदारी प्रकरण दाखल करून सुनावणी सुरू करा

पुढे बोलताना अभिषेक मनू सिंघवी म्हणाले की, अजित पवार गटाने दाखल केलेल्या एकूण प्रतिज्ञापत्रापैकी आम्ही 9 हजार फसणुकीचे प्रतिज्ञापत्र निवडणूक विभागात दाखल केले असून, त्याचे एकूण 24 प्रकार केले आहेत. तर निवडणूक आयोगाला आम्ही सांगितले आहे की, आयोगाला अधिकार आहे की, त्यांनी न्यायालयात फौजदारी प्रकरणाची सुनावणी सुरू करावी, कारण, फसवणुकीबाबत भारतीय दंड संहितेत कलम असून, त्यानुसार, कारवाई करून न्याय देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : देवेंद्र फडणवीस थेटच बोलले; संजय राऊतांची विकृत मानसिकता दिसून आली

प्रतिज्ञापत्रात शरद पवारांना विरोध नाही

निवडणूक विभागात युक्तिवाद करताना अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडण्यात आल्याचे सांगत अभिषेक मनू सिंघवी यांनी सांगितले की, अजित पवार गटाने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये कोणीच शरद पवारांना मी विरोध करतो असे म्हटले नाही. खोटे सांगून प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये निवडणूक आयोग योग्य तो निर्णय देऊन आम्हाला न्याय देईल अशी अपेक्षा असल्याचेही शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी यावेळी सांगितले. आता याप्रकरणाची पुढील सुनावणी 24 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -