सध्या देशात कोरोना रुग्णांबरोबरच एच3एन2 इन्फ्लुएन्झा या विषाणूचा संसर्ग झालेल्या रु्गणांची संख्या वाढू लागली आहे. सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी अशी साधारण सर्दी सारखी या आजाराची लक्षणे आहेत. विशेष म्हणजे घऱात एखाद्या व्यक्तीला याची लागण झाली तर लगेचच संपूर्ण कुटुंबाला त्याची लागण होते. यामुळे वेगाने वाढणाऱ्या या विषाणूचा सामना करण्यासाठी रोगप्रतिकारकशक्ती मजबूत असणे गरजेचे आहे. त्यासाठी आपल्या किचनमधील काही मसाल्यांचा आहारात नियमित वापर करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
मेथी दाणे
मेथीच्या बियांना Trigonella foemum graecum असेही म्हणतात. यात अँटी वायरल गुण असून व्हायरसचा खात्मा करण्याची क्षमता मेथीमध्ये असते. तसेच मेथीमधील अँटी मायक्रोबियल, अँटी इफ्लामेटरी गुणांमुळे रोगप्रतिकारकशक्तीही वाढते.
दालचिनी
दालचिनी हा आपल्या किचनमध्ये आवर्जुन वापरला जाणारा मसाल्यांपैकी एक पदार्थ आहे. विज्ञानाच्या भाषेत दालचिनीला Cinnamomum verum असेही म्हटले जाते. दालचिनी अँटी व्हायरल असल्याबरोबरच अँटी बँक्टिरियल, अँटी मायक्रोबियल, अँटी फंगलही आहे.
हळद
भारतीय जेवणाचा हळद हा अविभाज्य घटक आहे. आपले जेवण हळदीविना पूर्णच होऊ शकत नाही. हळदीचा पिवळा रंग पदार्थात उतरल्यावर तो पदार्थ आकर्षक तर होतोच शिवाय त्याची चवही बदलते. पण तुम्हांला माहित आहे का हळद हे उत्तम अँटीबायोटीकही आहे. हळदीमध्ये रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्याचा गुणधर्म आहे. .यामुळे सर्दी खोकला झाल्यावर आपल्याकडे हळदीचे दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे संसर्ग रोखता येतो.

लवंग
लवंग हा गरम मसाल्यातील एक महत्वाचा पदार्थ असून तो चवीला तिखट असतो. यामुळे झणझणीत जेवणात लवंगाचा वापर केला जातो. पण तुम्हाला वाचून आशर्चय वाटेल की लंवगात अँटी बँक्टिरियल, अँटी इंफ्लामेटरी, अँटी फंगल आणि मायक्रोबियल गुणही असतात. ते रोगप्रतिकारकशक्ती वाढवून रोगाला शरीरातून पळवून लावतात.

आलं
अद्रक म्हणजे आलं. हेच आलं टाकून बनवलेला चहा सगळ्यांनाच आवडतो. त्यातही सर्दी खोकल्यात आल्याचा चहा पिल्यावर आराम मिळतोच. आल्यामध्ये अनेक औषधी गुण असून संसर्ग रोखण्याचे काम आलं करतं. रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्याचेही गुण यात असल्याने सर्दी खोकला झाल्यास आलं टाकून काढा पिण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.